कारावासात सुरक्षेसाठी आम आदमी पक्षाच्या मंत्र्याला दिले १० कोटी रुपये ! – सुकेश चंद्रशेखर यांचा दावा

कारावासात सुरक्षेसाठी आम आदमी पक्षाचे मंत्री सत्येंद्र यांना १० कोटी रुपये दिल्याचा दावा मंडोली कारावासात बंद असलेल्या सुकेश चंद्रशेखर यांनी केला. सुकेश चंद्रशेखर यांच्या या दाव्यामुळे आम आदमी पक्षाच्या अडचणीत वाढ झाली आहे.

माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तुम्ही आदर कराल, अशी आशा !

भारतातील कथित पुरोगामी आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा उदोउदो करणारी टोळी तस्लिमा नसरीन यांचा आवाज दाबून त्यांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी करणार्‍यांच्या विरोधात काहीही बोलत नाही, हे लक्षात घ्या !

सीएए कायदा हा आसाम करार आणि स्थानिकांच्या सांस्कृतिक अधिकारांचे हनन करत नाही !

केंद्रशासनाचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

बलात्कारानंतरच्या कौमार्य चाचणीवर सर्वोच्च न्यायालयाकडून बंदी !

यासह अशा प्रकारची चाचणी करणार्‍यांना गैरवर्तनाच्या आरोपाखाली दोषी ठरवले जाईल, असेही स्पष्ट केले.

डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांच्या निवासस्थानी सुरक्षा प्रदान करण्यावरून देहली उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला प्रश्‍न

भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी हे केवळ खासगी नागरिक नाहीत, तर सरकारने त्यांना झेड श्रेणीची सुरक्षा प्रदान दिली आहे. त्यांच्या खासगी निवासस्थानी सुरक्षा देण्याची योजना कशी आहे ?,  असा प्रश्‍न देहली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारला.

शिवलिंगाला संरक्षण मिळण्यासंदर्भातील हिंदूंची भूमिका सर्वोच्च न्यायालय ऐकणार

वाराणसी येथील ज्ञानवापी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने हिंदु पक्षाला मोठा दिलासा देत तेथे सापडलेल्या शिवलिंगाला संरक्षण देण्याच्या विषयावर सुनावणी करणार असल्याचे मान्य केले. याआधी ‘केवळ १२ नोव्हेंबरपर्यंत शिवलिंगाला संरक्षण देण्यात येईल’, असे न्यायालयाने म्हटले होते.

केजरीवाल मौलानांना प्रतिवर्षी १८ सहस्र रुपये देतात ! – केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर

त्यांनी कधी हिंदूंच्या मंदिरांतील पुजारी, गुरुद्वारांतील ग्रंथी आणि चर्चमधील पाद्री यांनी १८ सहस्र रुपये मानधन दिले आहे का ?, असा प्रश्‍न केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी विचारला आहे.

देहली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांना धमक्या

स्वाती मालिवाल यांनी म्हटले आहे की, माझी सुरक्षा देव करेल. अशा धमक्यांना मी भीक घालत नाही. मी सत्यासाठी बोलत राहील. धाडस असेल, तर समोर येऊन गोळ्या घाला.

बहिणीची छेड काढणार्‍यास विरोध करणार्‍या मुलाची अन्य अल्पवयीन मुलांकडून हत्या

अशी घटना देहली पोलिसांना लज्जास्पद ! अल्पवयीन मुले मुलीची छेड काढतात आणि विरोध करणार्‍याची हत्या करतात, यावरून समाजाची नैतिकता किती रसातळाला गेली आहे, हे लक्षात येते !

देहलीत ४ खलिस्तानी आतंकवाद्यांना अटक

त्यांच्याकडून ५ चिनी ग्रेनेड, एके ४७ रायफल आणि ९ सेमी ऑटोमॅटिक पिस्तुल जप्त करण्यात आली. ही शस्त्रे पाकमधून ड्रोनद्वारे पंजाबला पाठवण्यात आली होती.