मला सगळ्यांची बायका-मुले आणि घरे ठाऊक आहेत ! – ‘झोमॅटो’चा ‘डिलिव्हरी बॉय’ नदीम याची धमकी

(‘डिलिव्हरी बॉय’ म्हणजे ऑनलाईन विकत घेतलेल्या वस्तू किंवा खाद्यपदार्थ  घरपोच आणून देणारी व्यक्ती)

नवी देहली – देशाच्या राजधानीत ‘झोमॅटो’ या ऑनलाईन खाद्यपदार्थ व्रिकी करणार्‍या आस्थापनाचा ‘डिलिव्हरी बॉय’  नदीम याने पोलीस चौकीसमोर स्वतःच्या दुचाकीला आग लावली. या आगीत पोलीस चौकीचीही काही प्रमाणात हानी झाली. नदीमने पोलिसांवर दगडफेकही केली. या वेळी त्याने घटनास्थळी जमलेल्या लोकांना ‘मला सगळ्यांची बायका-मुले आणि घरे ठाऊक आहेत’, अशा शब्दांत धमकी दिली.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, महंमद नदीम हा ‘झोमॅटो’मध्ये ‘डिलिव्हरी बॉय’ म्हणून काम करतो. तो देहलीतील हौजरानी भागातील रहिवासी आहे. दोन दिवसांपूर्वी खान मार्केटमध्ये एका महिलेने नदीम तिच्याकडे टक लावून पहात असल्याविषयी नदीमच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली होती. त्यामुळे पोलिसांनी नदीमला खडसावून सोडून दिले होते. नदीमने मात्र ‘पोलीस कर्मचार्‍याने मला थप्पड मारली’, असा कांगावा केला. दुसर्‍या दिवशी नदीम पेट्रोल घेऊन पोलीस चौकीच्या परिसरात आला. तेथे त्याने पेट्रोल शिंपडले आणि स्वत:ची दुचाकी पेटवून दिली. या प्रकरणी नदीमला अटक करण्यात आली असून पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत. (सदर व्यक्ती पोलीस चौकीच्या परिसरात येऊन दुचाकीला आग लावेपर्यंत पोलीस झोपले होते का ? हे पोलिसांना लज्जास्पद ! – संपादक)

संपादकीय भूमिका

असे धर्मांध नोकरी करण्याच्या नावाखाली लोकांची कशी माहिती गोळा करतात, हेच यावरून लक्षात येते !  या माहितीचा ते वापर लव्ह जिहादसाठी  करत नसतील कशावरून ?