बहिणीची छेड काढणार्‍यास विरोध करणार्‍या मुलाची अन्य अल्पवयीन मुलांकडून हत्या

नवी देहली – येथील पटेलनगरामध्ये एका १७ वर्षांच्या मुलाची चाकू खुपसून हत्या करण्यात आली. हा मुलगा त्याच्या बहिणीची छेड काढणार्‍याला विरोध करत होता. या घटनेचे चित्रीकरण सीसीटीव्हीमध्ये झाले आहे. हत्या करणारेही अल्पवयीन आहेत.

संपादकीय भूमिका

अशी घटना देहली पोलिसांना लज्जास्पद ! अल्पवयीन मुले मुलीची छेड काढतात आणि विरोध करणार्‍याची हत्या करतात, यावरून समाजाची नैतिकता किती रसातळाला गेली आहे, हे लक्षात येते !