माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तुम्ही आदर कराल, अशी आशा !

तस्लिमा नसरीन यांचे इलॉन मस्क यांना उद्देशून ट्वीट !

बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन

नवी देहली – १९९० च्या दशकापासून विविध सरकारांनी माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला. माझ्या पुस्तकांवर बंदी घातली. मला विविध देशांमध्ये येण्यापासून रोखले. प्रकाशक आणि संपादक माझ्या लिखाणाला ‘सेन्सॉर’ करतात. फेसबुक मला माझी मते मांडण्यावर निर्बंध आणते. मला ट्विटरवर धमक्या दिल्या जातात. मी आशा करते की, तुम्ही माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर कराल, असे ट्वीट प्रसिद्ध बांगलादेशी लेखिका आणि इस्लामच्या टीकाकार तस्लिमा नवरीन यांनी ट्विटरचे नवे मालक इलॉन मस्क यांना उद्देशून नुकतेच केले.

संपादकीय भूमिका

  • भारतातील कथित पुरोगामी आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा उदोउदो करणारी टोळी तस्लिमा नसरीन यांचा आवाज दाबून त्यांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी करणार्‍यांच्या विरोधात काहीही बोलत नाही, हे लक्षात घ्या !