देहलीत ४ खलिस्तानी आतंकवाद्यांना अटक

४ खलिस्तानी आतंकवाद्यांना अटक

देहली – देहली पोलिसांच्या विशेष पथकाने पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय.एस्.आय.च्या आदेशावर काम करणार्‍या खलिस्तानी आतंकवादी लंडा हरिके आणि हरविंदर रिंडा यांच्याशी संबंध असलेल्या ४ आतंकवाद्यांना अटक केली आहे.

त्यांच्याकडून ५ चिनी ग्रेनेड, एके ४७ रायफल आणि ९ सेमी ऑटोमॅटिक पिस्तुल जप्त करण्यात आली. ही शस्त्रे पाकमधून ड्रोनद्वारे पंजाबला पाठवण्यात आली होती.