आसाममध्‍ये ‘लव्‍ह जिहाद’ करणार्‍यांना जन्‍मठेपेची शिक्षा होणारा कायदा करणार ! – हिमंत बिस्‍व सरमा, मुख्‍यमंत्री, आसाम

आसामचे मुख्‍यमंत्री हिमंत बिस्‍व सरमा यांची घोषणा !

हिमंत बिस्‍व सरमा

गौहत्ती (आसाम) – आसाममध्‍येही ‘लव्‍ह जिहाद’च्‍या विरोधात कायदा करण्‍यात येणार असून यात जन्‍मठेपेच्‍या शिक्षेची तरतूद करण्‍यात येणार आहे, अशी माहिती आसामचे मुख्‍यमंत्री हिमंत बिस्‍व सरमा यांनी दिली आहे. तसेच मुख्‍यमंत्र्यांच्‍या अनुमतीखेरीज हिंदु आणि मुसलमान एकमेकांची भूमी खरेदी करू शकणार नाहीत. आसाममधील गोलपारा जिल्‍ह्यात हिंदू अल्‍पसंख्‍यांक झाल्‍यामुळे समाजातील लोकांची भूमी विकण्‍यास अजिबात अनुमती दिली जाणार नाही, अशी घोषणा त्‍यांनी केली. भाजप प्रदेश कार्यकारिणीच्‍या बैठकीत ही घोषणा केली.

आसाममधील आदिवासी समाजातील लोकांच्‍या भूमीच्‍या हक्‍कांचे संरक्षण करण्‍यासाठी कायदाही करण्‍यात येणार आहे, अशी माहितीही मुख्‍यमंत्री सरमा यांनी दिली.

आसाममध्‍ये जन्‍मलेल्‍यांनाच नोकरी मिळणार !

मुख्‍यमंत्री सरमा म्‍हणाले की, राज्‍यात केवळ अशा लोकांनाच सरकारी नोकर्‍यांसाठी घेतले जाईल, ज्‍यांचा जन्‍म आसाम राज्‍यात झाला आहे. राज्‍याच्‍या पालटत्‍या लोकसंख्‍येच्‍या वाढत्‍या चिंतेमुळे असे केले जात आहे. स्‍थानिक लोकांना नोकर्‍या देण्‍याचे धोरण २ महिन्‍यांत आणले जाईल.

संपादकीय भूमिका 

असा कायदा केंद्र सरकारनेच संपूर्ण देशासाठी केला पाहिजे !