Gujarat Temple Attacked : कर्णावती (गुजरात) येथे धर्मांध मुसलमानांचे हिंदु मंदिरावर आक्रमण !

  • देवतांच्या मूर्तींची तोडफोड

  • परिसरातील थडगी तोडल्याच्या अफवेवरून आक्रमण !

कर्णावती (गुजरात) – गुजरातच्या प्रेरणा पीठ निश्कलंकी मंदिरावर धर्मांध मुसलमानांनी आक्रमण केले. या वेळी त्यांनी देवी-देवतांच्या मूर्ती तोडल्या. येथील पिराना येथे असलेल्या या मंदिरावरील आक्रमणाचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, बहुतांश जमाव मुसलमानी टोप्या परिधान करून मंदिरावर लाठ्याकाठ्यांनी आक्रमण करत आहे. विश्‍व हिंदु परिषदेने म्हटले आहे की, हे आक्रमण पूर्वनियोजित होते.

या जागेवरून अनेक वर्षांपासून वाद चालू आहे. मुसलमानांनी या मंदिराची जागा दर्गा असल्याचा दावा केला आहे, तर या ठिकाणी मूळ मंदिर असल्याची हिंदूंची श्रद्धा आहे. या भागातून काही थडगी हटवली गेल्याची अफवा पसरली होती. यामुळे स्थानिक मुसलमानांनी काठ्या आणि लोखंडी सळ्या घेऊन मंदिरावर आक्रमण केले. या आक्रमणाचा व्हिडिओ विहिंपने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम खात्यावरून प्रसारित केला आहे.


काय आहे प्रकरण ?

याप्रकरणी न्यायालयात खटला चालू आहे. वर्ष २०२२ मध्ये इमामशाह दर्गा न्यासाच्या वतीने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र प्रविष्ट (दाखल) करण्यात आले. त्यात असे म्हटले होते की, प्रत्यक्षात मूळ धार्मिक स्थळ हिंदूंचे असून संस्था मात्र ‘सतपंथी’ची आहे. सतपंथ हा मुसलमानांचा एक पंथ मानला जातो.

इमामशाह न्यासाने प्रतिज्ञापत्र सादर करत म्हटले होते की, पिराणा येथे ६०० वर्षे जुन्या मशिदी, दर्गा आणि मंदिरे आहेत. ही जागा मुळात मुसलमान संस्था आणि हिंदु धार्मिक स्थळ आहे, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. न्यासाच्या विश्‍वस्तांमध्ये हिंदु आणि मुसलमान अशा दोन्ही समाजातील लोकांचा समावेश असल्याचेही सांगण्यात आले आहे.


संपादकीय भूमिका

  • हिंदु मंदिरावर आक्रमण करून देवतांच्या मूर्ती तोडण्याला हा भारत आहे कि पाकिस्तान ?
  • बहुसंख्य हिंदूंच्या भारतात त्यांची मंदिरे असुरक्षित आहेत, तर बहुसंख्यांक मुसलमानांच्या पाकिस्तानातही हिंदूंचीच मंदिरे असुरक्षित आहेत ! ही धर्मांध मुसलमानांची धर्मांधता आहे कि हिंदूंमधील धर्माभिमानशून्यता ?
  • गुजरातमध्ये भाजपची सत्ता असतांना अशी आक्रमणे होणे हिंदूंना अपेक्षित नाही ! संबंधित धर्मांधांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी सर्वत्रच्या हिंदूंची मागणी आहे !