हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियान !’
धनबाद (झारखंड) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने झारखंड आणि बंगाल या राज्यांमध्ये ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियान’ राबवण्यात आले. या अंतर्गत राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’, ‘हिंदु राष्ट्र-जागृती बैठका’ आणि वैयक्तिक संपर्क यांच्या माध्यमातून ‘हलाल अर्थव्यवस्था – एक भारतविरोधी षड्यंत्र’ याविषयी धर्मप्रेमींना अवगत केले.
१. हिंदु राष्ट्र-जागृती सभा
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने झारखंड आणि बंगाल या राज्यांमध्ये ६ ठिकाणी हिंदु राष्ट्र-जागृती सभांचे आयोजन करण्यात आले.
अ. देवघर : येथील ‘स्वामी विवेकानंद सेवाश्रमा’चे स्वामी उदय महाराज यांनी येथील बाबा बैद्यनाथ विवाह भवन येथे सभेचे आयोजन केले. या सभेत सर्वश्री रंजन भाई, संजय उपाध्याय, बिपिन मिश्रा, बिनय पांडेय, निरंजन कुमार, महेश राय, पंकज बधोरिया यांसह ७० हून अधिक लोक सहभागी झाले होते.
आ. धनबाद : येथील राणी तालाबमधील शनि मंदिराच्या प्रांगणामध्ये ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’चे आयोजन करण्यात आले होते. येथील श्री शिव-शक्ति मांदर धीरेंद्र पुरमचे विश्वस्त आणि धर्मप्रेमी श्री. पंकजकुमार सिंह यांनी या धर्मसभेचे आयोजन केले होते. या धर्मसभेला डॉ. एन्.के. सिंह, सर्वश्री योगेंद्र तुलसियान, एस्.पी. सिन्हा आणि मिथिलेशकुमार सिंह यांच्यासह ११० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते.
इ. खाटिक समाजाचे बंगाल राज्याध्यक्ष श्री. विवेक सोनकर यांनी हावडा येथील खाटिक समाजासाठी धनसार येथे सरस्वती विद्या मंदिरामध्ये एका धर्मसभेचे आयोजन केले होते. या सभेला विविध संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत ९० हून अधिक लोक उपस्थित होते.
ई. सरस्वती विद्या मंदिर, धनसार येथे झालेल्या सभेमध्ये अनेक शिक्षक आणि शिक्षिका उपस्थित होत्या.
उ. कतरास गड येथील सरस्वती शिशु मंदिराचे प्रांगणात धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी १०० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते.
ऊ. राजस्थानी समाज भवन येथे धर्मसभेचे आयोजन करण्यात आले. येथे ११० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते.
२. हिंदु राष्ट्र-जागृती बैठकांचे आयोजन
अ. जमशेदपूर : माहेश्वरी मंडळाचे श्री. चित्तरमल धूत आणि श्री. महेश लखोटिया यांनी माहेश्वरी मंडळ भवन, जुगसलाई येथे बैठकीचे आयोजन केले.
आ. बिष्टुपूर : चेंबर ऑफ कॉमर्स आणि हिंदु पीठ, जमशेदपूर यांच्या वतीने चेंबर भवन, बिष्टुपूर येथे बैठकीचे आयोजन केले. विवेकानंद सेवा समिती, जमशेदपूरचे श्री. उमाकांत सिंह यांच्याकडून राजस्थान भवन, मानगो येथे, तर माहेश्वरी सभा, रांची यांचे श्री. शिवशंकर साबू आणि श्री. राजकुमार मारू यांच्या वतीने माहेश्वरी भवन येथे, तसेच चंद्रकांत रायपत यांच्याकडून हॉटेल ग्रीन एकर, रांची येथे बैठकांचे आयोजन करण्यात आले होते.
इ. धनबाद : ‘तरुण हिंदू’चे संस्थापक डॉ. नील माधव दास यांनी त्यांच्या संघटनेच्या वतीने श्री जगन्नाथ हॉस्पिटल, धनबाद येथे एका बैठकीचे आयोजन केले होते.
ई. हजारीबाग : सारथी साहाय्यता समितीचे श्री. गौतम सिंह, श्री. अजित कुमार यादव तथा श्री. पिंकू सिंह यांनी येथे एका बैठकीचे आयोजन केले होते. धर्मरक्षा संघ आणि ‘पश्चिम बंगेर जन्य’चे संस्थापक श्री. प्रकाश दास यांनी बडा बाजारामध्ये बैठकीचे आयोजन केले होते.
उ. असनसोल : अधिवक्ता पियूष कांती गोस्वामी यांनी असनसोल जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणामध्ये, तर आर्य महासंघाचे सर्वश्री संदीप आर्य आणि राजेश बरनवाल यांनी हिरापूर बाजारामध्ये बैठकीचे आयोजन केले.
ऊ. खिदिरपूर : येथे श्री. संतोषकुमार यादव यांनी बैठकीचे आयोजन केले. या बैठकीमध्ये स्वामी वृंदावन महाराज यांची वंदनीय उपस्थिती होती.
ए. बंगाल : शास्त्र धर्म प्रचार सभेचे डॉ. कौशिकचंद्र मल्लिक यांनी त्यांच्या निवासस्थानी बैठकीचे आयोजन केले. या बैठकीमध्ये पू. डॉ. शिवनारायण सेन यांची वंदनीय उपस्थिती होती.
ऐ. रांची : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे श्रीकृष्ण पब्लिक स्कूल, गुजराती स्कूल आणि लालजी हिरजी रोड येथे बैठकांचे आयोजन करण्यात आले.
३. हिंदु राष्ट्र-जागृती संपर्क अभियान
अ. हिंदु राष्ट्र-जागृती संपर्क अभियानाच्या अंतर्गत श्री. रमेश शिंदे यांनी ‘चेंबर ऑफ कॉमर्स, पूर्व सिंहभूम’चे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष अधिवक्ता मानव केडिया, रांची येथील एकल ग्रामोत्थान प्रतिष्ठानचे विश्वस्त अन् अध्यक्ष, तसेच सेवा भारतीचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत रायपत, रांचीमध्ये जनजातीय लोकांसाठी प्रखरतेने कार्य करणार्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. प्रिया मुंडा, रांची येथील ‘शिवसेने’चे श्री. संदीप मुखर्जी, साप्ताहिक ‘पांचजन्य’चे पत्रकार श्री. रितेशकुमार कश्यप, ‘समाचार प्लस’चे उपसंपादक श्री. पंकज प्रसून, ‘तरुण हिंदू’चे संस्थापक डॉ. नील माधव दास आणि श्री. निशांत दास, उद्योगपती श्री. विमल जायसवाल, बडा बाजार लायब्ररीचे श्री. जयगोपाल गुप्ता, श्री. बालकृष्णजी, ‘हिंदु इको सिस्टिम’चे श्री. अरुण तिवारी यांची भेट घेतली. या प्रसंगी या हिंदुत्वनिष्ठांना हलाल अर्थव्यवस्थेच्या गंभीर परिणामांविषयी माहिती देण्यात आली.
विशेषत्रिपुरा तथा मेघालयचे माजी राज्यपाल श्री. तथागत राय यांची भेट घेतली आणि त्यांना ‘हलाल अर्थव्यवस्थे’ विषयी माहिती देण्यात आली. या वेळी श्री. राय यांनी श्री. रमेश शिंदे यांना स्वत: लिहिलेले ‘अप्रतिम नायक : डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी’ हे पुस्तक भेट दिले. |
आ. झारखंड उद्योग आणि व्यापारी संस्थेचे महासचिव श्री. राजीव शर्मा यांची श्री. रमेश शिंदे यांनी भेट घेतली. या वेळी श्री. शिंदे यांनी त्यांना ‘हलाल प्रमाणपत्रा’विषयीची माहिती सांगितली. ती माहिती ऐकून श्री. शर्मा यांनी ‘याविषयी व्यापार्यांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न करू’, असे सांगितले.