
पुणे – सोसायट्यांच्या (गृहनिर्माण प्रकल्पाच्या) स्वयं पुनर्विकासाला चालना देण्यासाठी समूह स्वयंपुनर्विकासाचा (क्लस्टर) लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. राज्य सरकारने स्वयं पुनर्विकासाच्या संदर्भात १८ निर्णय घेतले आहेत. मुंबई शहरामध्ये स्वयंपुनर्विकासाचे प्रारूप यशस्वी होतं आहे. स्वयं पुनर्विकास झालेल्या सोसायट्यांमध्ये घराचा आकारही वाढला आहे. राज्यातील सव्वा दोन लाख सहकारी गृहनिर्माण संस्थांना सहकारामध्ये स्थान नसल्याचे लक्षात आल्यानंतर वर्ष २०१९ मध्ये कायद्यात पालट करण्यात आले. पुढील काही दिवसात हे नियम घोषित केले जातील. या नियमांच्या आधारे गृहनिर्माण संस्थांना कामकाज करणे शक्य होणार आहे. अपार्टमेंट कायद्यामध्येही सुधारणा केली आहे. अपार्टमेंटच्या पुनर्विकासाच्या अडचणीही दूर होतील. गृहनिर्माण प्रकल्पांच्या छतावर सोलर बसवण्यासाठी तसेच हे प्रकल्प सोलरयुक्त होण्यासाठी महासंघाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन फडणवीस यांनी केले.