Close
श्रावण कृष्ण पक्ष चतुर्दशी, कलियुग वर्ष ५११९

राष्ट्रीय बातम्या

संभाजीनगर महापालिकेत गोंधळ आणि तोडफोड

संभाजीनगर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत वन्दे मातरम् चालू असतांना एम्आयएम् आणि काँग्रेस यांचे नगरसेवक उभे न राहिल्याने शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांनी त्यांचा निषेध केला.

केरळमध्ये लव्ह जिहादची प्रकरणे दिसतात ! – किरेन रिजिजू

केरळमध्ये लव्ह जिहादची प्रकरणे चालू असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. या प्रकरणाविषयी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू असल्याने मी यावर अधिक काही बोलू शकत नाही, असे विधान केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी येथे केले.

गरब्यामधील प्रवेशासाठी आधारकार्ड बंधनकारक करा !

नवरात्रोत्सवातील गरब्यामध्ये केवळ हिंदूंनाच प्रवेश देण्यात यावा. त्यासाठी आधारकार्ड बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी हिंदु उत्सव समितीने येथे केली आहे.

(म्हणे) ‘मुसलमान असल्यामुळे भारत मला लक्ष्य करत आहे !’ – डॉ. झाकीर नाईक यांचा कांगावा

मी जिहादचे समर्थन करत नाही. मी मुसलमान असल्यामुळे मला भारताच्या अन्वेषण यंत्रणा लक्ष्य करत आहेत, असा आरोप भारताने फरार घोषित केलेले डॉ. झाकीर नाईक यांनी केला आहे.

गोव्यातील पाचवीच्या विद्यार्थ्यांना साधा भागाकारही येत नसल्याचा मुख्यमंत्री पर्रीकर यांनी घेतला अनुभव !

राज्यातील प्राथमिक शिक्षणाची स्थिती चिंताजनक आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यावर भर देणार आहे.

ब्ल्यू व्हेल चॅलेंज या विघातक खेळासंदर्भात गोवा पोलिसांकडून पालकांना सतकर्तेची सूचना

जगभरात, तसेच भारतातही अनेक लहान मुलांचे, तसेच युवकांचे प्राण घेणार्‍या ब्ल्यू व्हेल चॅलेंज या विघातक ऑनलाईन खेळाच्या संदर्भात गोवा पोलिसांकडून पालकांना सतकर्तेची सूचना देण्यात आली आहे.

अमली पदार्थ प्रकरणी गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण अल्प : पोलिसांवर खापर

अमली पदार्थ प्रकरणी मागील चार वर्षांची आकडेवारी पाहिल्यास गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण अल्प आहे आणि याला पोलीसच उत्तरदायी आहेत, असा आरोप होत आहे.

उत्तराखंडच्या बाराहोती सीमेवर चीनच्या सैनिकांनी भारतीय गुराख्यांचे तंबू तोडले ! 

उत्तराखंडच्या बाराहोती सीमेवर चीनच्या सैनिकांनी भारतीय गुराख्यांना धमकावून त्यांचे येथे असणारे तंबू तोडून टाकले. तसेच त्यांना डोंगरावरून खाली जाण्यासाठी बाध्य केले.

रस्त्यावरचा नमाज रोखू शकत नाही, तर जन्माष्टमीवर बंदी कशी घालू ? – योगी आदित्यनाथ

जर ईदच्या काळात मी रस्त्यावर नमाज पठण करणार्‍यांना रोखू शकत नसेन, तर ‘राज्यातील पोलीस ठाण्यांमध्ये जन्माष्टमीचा उत्सव साजरा करू नका’, असे सांगण्याचा कोणताही अधिकार मला नाही

कर्नल पुरोहित यांच्या जामिनावरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या जामीनअर्जावरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने १७ ऑगस्ट या दिवशी राखून ठेवला. पुरोहित यांच्या बाजूने अधिवक्ता हरीश साळवे यांनी न्यायालयात बाजू मांडली.