देहलीत ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण उघड
स्वतःच्या अल्पवयीन मुलीची छेड काढणार्या मुसलमानांविरुद्ध सरिता शर्मा यांनी केली होती तक्रार !
नवी देहली – देहलीत ‘लव्ह जिहाद’चे नवीन प्रकरण समोर आले आहे. देहलीतील जहांगीरपुरी येथे मुसलमान तरुणांनी सरिता शर्मा (वय ३६ वर्षे) नावाच्या हिंदु महिलेच्या घरात घुसून त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. आरोपींपैकी एक मुसलमान तरुण सरिता शर्मा यांच्या अल्पवयीन मुलीची छेड काढायचा.
Sarita Sharma murdered by a Mu$l!m youth; had issued a threat 'Drop the complaint or pay for your life' – Case of Love Ji#ad in Jahangirpuri Delhi.
Earlier Sarita had filed a complaint against the youth for eve teasing her adolescent daughter.
Inaction by the Police even after… pic.twitter.com/FoumZFOmBo
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 27, 2024
सरिता शर्मा यांनी आरोपी मुसलमान तरुणाच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती. ‘माझ्याविरुद्धची तक्रार मागे घे, अन्यथा जिवे मारीन’, अशी धमकी आरोपी तरुणाने सरिता शर्मा यांना दिली होती. हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अन्वेषण चालू केले आहे.
सौजन्य IndiaTV News
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, २६ एप्रिल २०२४ या दिवशी आरोपी तरुण आणि त्याचे साथीदार सरिता शर्मा यांच्या देहलीतील जहांगीरपुरी भागातील घरात घुसले आणि त्यांच्यावर गोळ्या झाडून तेथून पळ काढला. कुटुंबियांनी घायाळ महिलेला बाबू जगजीवन राम रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
तक्रार करूनही पोलिसांनी वेळीच कारवाई न केल्याने सरिता यांची हत्या ! – कुटुंबियांचा आरोप
आरोपी मुसलमान तरुणांना पकडण्यासाठी पोलिसांकडून विशेष पथके सिद्ध करण्यात आली आहेत. या प्रकरणी मृत सरिता शर्मा यांच्या कुटुंबियांनी पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. सरिता शर्मा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी वेळीच आरोपीवर कारवाई केली असती, तर आज ही घटना घडली नसती, असे कुटुंबियांनी सांगितले. (अशा कामचुकार पोलिसांवर कठोर कारवाई केली पाहिजे, जेणेकरून पोलीस अधिकारी जनतेच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्याचे धाडस करणार नाही ! – संपादक)
संपादकीय भूमिकाआणखी किती घटना घडल्यावर देशपातळीवर लव्ह जिहादविरोधी कठोर कायदा केला जाणार आहे ? |