
वसई (जिल्हा ठाणे) – मीरा रोडमध्ये रहाणार्या २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्याची सक्ती केल्याचा प्रकार समोर आला आहे. तिची अश्लील छायाचित्रे काढून तिच्याकडून लाखो रुपये उकळण्यात आहे होते. तसेच तिचे केस काढून तिला विद्रुप करण्यात आले होते. या प्रकरणी नयानगर पोलिसांनी ६ जणांच्या विरोधात फसवणूक, बलात्कार, विनयभंग आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हे नोंद केले आहेत.
ऑक्टोबर २०२३ मध्ये तिची ओळख कल्याण येथे राहणार्या मोहसीन शेख (२२) याच्यासमवेत झाली होती. त्याने तिला गुंगीकारक पदार्थ टाकून बिर्याणी खायला दिली होती. यानंतर पीडित तरुणी बेशुद्ध झाल्यानंतर मोहसीन याने तिच्यावर बलात्कार केला आणि तिची अश्लील छायाचित्रे काढली. यानंतर तो तिच्याशी वारंवार बळजोरी करून शरीरसंबंध प्रस्थापित करत होता. यानंतर तिला इस्लाम धर्म स्वीकारण्याची सक्ती करू लागला. तिने नकार दिल्यावर सतत तिला मारहाण करू लागला. तिच्या डोक्यावरील केसही काढून तिला विद्रुप केले होते. तिच्याकडून पावणेतीन लाख रुपयेही उकळले, असा आरोप तिने तक्रारीत केला आहे.
आरोपी मोहसीन शेख याचे भाऊ जाफर, मोबिन आणि मेव्हणा अश्फाक शेख यांनी तिचा विनयभंग केला होता. काका इम्रान बागवान याने तिला मारहाण केली. आरोपी मोहसीन याची आई शहनाज हिनेही इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणला, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.
संपादकीय भूमिका
|
बांगलादेशात पुन्हा हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींची तोडफोड !
६० वर्षांच्या अबरार याने ४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून केला बलात्कार
आसामच्या माजी पोलीस उपमहानिरीक्षकांची ५३ कोटी रुपयांची संपत्ती जप्त !
Kailash Vijayvargiya On RSS : रा.स्व. संघात गर्दी वाढल्याने चांगल्या लोकांची कमतरता !
फोर्ट (मुंबई) येथील शासकीय जागेच्या प्रकरणी चर्चला जिल्हाधिकार्यांकडून थकित पैशांच्या वसुलीची नोटीस !
Ghaziabad Mazar Demolished : गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे अतिक्रमण करून बांधलेली ३ मजली मजार भुईसपाट !