‘‘निरोगी रहायचे असेल, तर भरपूर खा-प्या’, असे आपल्याला नेहमी सांगितले जाते; मात्र भरपूर खाण्याने अनारोग्य आले आहे. वाहन चालवतांना आपण वाहतुकीचे नियम पाळतो, त्याचप्रमाणे आहार करतांनाही त्याचे नियम पाळणे आवश्यक आहे. उत्तम आरोग्यासाठी वेळ, प्रमाण आणि पदार्थ यांकडे लक्ष देऊनच आहार करणे आवश्यक आहे. असे असले, तरी आधुनिक जीवनशैलीत अनियमित आणि प्रमाणाबाहेर खाणे याकडेच लोक लक्ष देत आहेत. त्यामुळे भूक लागल्यावरच खाणे आणि तहान लागल्यावरच पाणी पिणे आवश्यक आहे. आहार आणि पाणी पिणे यांचे अतीप्रमाण टाळणे आवश्यक आहे.’
– वैद्या सुचित्रा कुलकर्णी, आहारतज्ञ
(साभार : दैनिक ‘लोकसत्ता’, २१.९.२०१४)