ठाकरे गटाच्या उपनेत्या डॉ. नीलम गोर्‍हे यांचा शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश !

सुषमा अंधारे यांनी प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटातील महिला नेत्यांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा होत असल्याच्या संदर्भात ‘सटरफटर लोकांमुळे नाराज होण्यासारखी परिस्थिती नाही’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी घेतली संजय राऊत यांची भेट !

मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी ६ जुलै या दिवशी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची दैनिक ‘सामना’च्‍या कार्यालयात भेट घेतली. तत्‍पूर्वी त्‍यांनी गाडीने एकत्र प्रवास केला.

वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून ठाकरे गटाला १५ दिवसांत भूमिका सांगण्‍याचे आवाहन !

प्रकाश आंबेडकर एम्.आय.एम्.शी युती करणार असल्‍याचीही चर्चा आहे. या पार्श्‍वभूमीवर त्‍यांचे हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.

विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाची सर्वाेच्च न्यायालयात याचिका !

१७ जुलै या दिवशी विधानसभेचे पावसाळी अधिवेशन चालू होणार आहे. त्यापूर्वी विधानसभा अध्यक्ष हा निर्णय येतील का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

माहीममध्‍ये अज्ञातांनी औरंगजेबासह प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र असलेले फलक लावले !

माहीम परिसरात अज्ञातांनी उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि औरंगजेब यांचे वादग्रस्‍त मजकुरासह एकत्रित छायाचित्र असलेले फलक मध्‍यरात्री लावले होते. सकाळी स्‍थानिक शिवसैनिकांनी तात्‍काळ हे फलक हटवले.

मुंबई येथे कोविड केंद्रातील घोटाळा प्रकरणी १६ हून अधिक ठिकाणी ‘ईडी’च्‍या धाडी !

मुंबई महापालिकेने ऑक्‍टोबर २०२२ मध्‍ये सुजित पाटकर यांच्‍या ‘लाईफलाईन हॉस्‍पिटल मॅनेजमेंट सर्व्‍हिसेस’ला ५ कोविड केंद्रांचे कंत्राट दिले होते; मात्र मुंबई महापालिकेने कंत्राट दिले, त्‍या वेळी हे आस्‍थापन अस्‍तित्‍वात नव्‍हते, तसेच ती नोंदणीकृत फर्म नसल्‍याचाही आरोप आहे.

उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेत कपात

सरकारने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्या सुरक्षेत कपात केली आहे. ‘मातोश्री’वर असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या संख्येतही कपात करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात अनेक शाळांत शिक्षक नसल्याने शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी ठिकठिकाणी आंदोलने !

महाराष्ट्रात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत असतांना  शिक्षकांची पदे रिक्त रहाणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !

‘टोलमुक्त कृती समिती’सह सर्वपक्षियांच्या आंदोलनानंतर ओसरगाव येथील टोल वसुलीला तात्पुरती स्थगिती !

‘टोल वसुली तूर्तास करू शकत नाही’, असे पत्र दिल्यानंतर त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले; मात्र पुन्हा टोल वसुली चालू केल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलन करू’ – आंदोलकांची चेतावणी, सिंधुदुर्ग

औरंगजेबाच्‍या मजारच्‍या संरक्षित स्‍मारकाचा दर्जा काढण्‍याचे धैर्य दाखवा ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

औरंगजेबाच्‍या विषयावरून राजकारण करण्‍यापेक्षा औरंगजेबाच्‍या ज्‍या चुकीच्‍या गोष्‍टी आहेत, त्‍या समाजातून हटवल्‍या पाहिजेत.