मुंबई – अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याला १० नोव्हेंबर २०२० या दिवशी अटक करण्यात आली होती. त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी ललित पाटील याला नाशिकचे जिल्हाप्रमुख केले होते. अटक झाल्यावर ललित पाटील याला पोलिसांनी १४ दिवसांची पोलीस कोठडी मागितली; मात्र पोलीस कोठडी मिळताच त्याला ससून रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यानंतर ललित पाटील याला न्यायालयीन कोठडी मिळाली; मात्र पोलिसांनी ललित पाटील याच्या पोलीस कोठडीची मागणी केली नाही. या वेळी ‘ललित पाटील याची चौकशी का झाली नाही ? चौकशी होऊ नये, यासाठी पोलिसांवर मुख्यमंत्र्यांनी कि गृहमंत्र्यांनी दबाव आणला ?’ असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. सध्या ललित पाटील पोलिसांच्या कह्यात आहे.
2020 में ललित पाटिल की गिरफ्तारी के बावजूद क्यों नहीं हुईं जाँच? कौन है जिम्मेदार तत्कालीन मुख्यमंत्री या गृहमंत्री – देवेंद्र फडणवीसhttps://t.co/S1brfBSSlw
— Police Mahanagar (@PoliceMahanagar) October 20, 2023