
मुंबई – दसरा सणाविषयी काहीच बोलायचे नाही. एकमेकांची लफडी बाहेर काढायची, एकमेकांवर टीका टिप्पणी करायची, याला ‘दसरा संमेलन’ म्हणतात का ? असा प्रश्न महाराष्ट्र करणी सेनेचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांकडून घेण्यात आलेल्या दसरा मेळाव्याविषयी उपस्थित केला आहे. २४ ऑक्टोबर या दिवशी उद्धव ठाकरे गटाकडून शिवाजी पार्क येथे, तर एकनाथ शिंदे गटाकडून आझाद मैदान येथे दसरा मेळावा साजरा करण्यात आला. या मेळाव्यामध्ये दोन्ही गटांकडून एकमेकांवर टीका करण्यात आली. दसरा मेळाव्याच्या व्यासपिठाचा उपयोग एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी होत असल्याविषयी वरील प्रतिक्रियेद्वारे सेंगर यांनी खंत व्यक्त केली.
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !