कोरोनाचा प्रभाव उणावूनही शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती ४२ टक्के !

जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार उणावला असला, तरी कोरोनाविषयीची भीती अल्प होत चालली आहे. परिणामी जिल्ह्यातील शाळा मोठ्या प्रमाणात चालू झाल्या आहेत. मात्र, शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती ४२.४२ टक्के एवढीच आहे.

कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम

कोरोना लसीकरणात कोणत्याही उणिवा राहू नयेत, यासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणाविषयीची रंगीत तालीम घेण्यात आली. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी याप्रसंगी भेट देऊन रुग्णालयातील सिद्धतेचा आढावा घेतला.

काँग्रेसच्या विरोधाला न जुमानता मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विटरवर संभाजीनगर नावाचा वापर चालू !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासकीय ट्विटरवर काँग्रेसच्या विरोधास आपण जुमानत नाही, हे दाखवून दिले आहे.

विश्‍व हिंदु परिषदेच्या वतीने १५ जानेवारी ते २७ फेब्रुवारीअखेर श्रीराम मंदिरासाठी निधी समर्पण अभियान ! – दादा वेदक, विश्‍व हिंदु परिषद

देशातील बहुसंख्य नागरिकांचा सहभाग असावा, या उद्देशाने विश्‍व हिंदु परिषदेच्या वतीने १५ जानेवारी ते २७ फेब्रुवारीअखेर निधी समर्पण अभियान राबवण्यात येणार आहे.

सीमालढ्यात मराठी माणसांची एकजूट दाखवूया ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून सीमा लढ्याचा वसा आणि वारसा मला मिळाला आहे.

शेतकरी आंदोलनाची स्थिती तबलिगी जमातसारखी होऊ नये !  

न्यायालयाला अशी चिंता व्यक्त करावी लागते, याला पोलीस, प्रशासन आणि शेतकरी उत्तरदायी आहेत ! सामान्य लोकांकडून दंड वसूल करणारे प्रशासन आणि पोलीस येथे गांधी यांच्या माकडांप्रमाणे कृती करत आहेत, तसेच नियम भंग करणारे शेतकरीही जनताविरोधी कृती करत आहेत !

अंमलबजावणी संचालनालयाकडून सौ. वर्षा राऊत यांना पुन्हा नोटीस

सौ. राऊत यांना ११ जानेवारी या दिवशी चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात बोलावण्यात आले आहे.

कोरोनावरील लस २०० रुपयांमध्ये शासनाला उपलब्ध करून देणार ! – आदर पूनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया

‘कोरोनाशिल्ड’ ही लस खासगी रुग्णालयांसाठी १ सहस्र रुपये, तर शासनासाठी २०० रुपयांना उपलब्ध करून देणार आहोत – सीरम इन्स्टिट्यूटचे आदर पूनावाला

राजकीय ‘लस’ !

जनहिताऐवजी स्वहिताकडे लक्ष देणारे असे राजकारणी भारताच्या भवितव्यासाठी घातक आहेत. सतत स्वहिताचाच विचार करणारे असे राजकारणी समाजाचा उत्कर्ष करू शकत नाहीत. त्यामुळे अशांना घरी बसवण्यासाठी आता जनतेनेच पावले उचलणे आवश्यक !