गोव्यात दिवसभरात ३ सहस्र ७२८ कोरोनाबाधित

गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर आणि परिचारिका मिळून अंदाजे १०० जण कोरोनाबाधित

पाकमध्ये बळजोरीने केलेल्या धर्मांतराच्या प्रकरणांत ७० टक्के प्रमाण हे हिंदु अथवा ख्रिस्ती मुलींचे !

शेजारील इस्लामी देश पाकिस्तान आणि बांगलादेश येथील अल्पसंख्यांक हिंदूंच्या समस्या सोडवण्यासाठी भारतातील आजपर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी काहीच केले नाही, हे लज्जास्पद !

‘सुपर स्प्रेडर’ शोधण्यासाठी पुणे महापालिकेची विशेष मोहीम !

एका क्षेत्रीय कार्यालयाने प्रतिदिन कमीत कमी १०० आणि जास्तीत जास्त कितीही नागरिकांच्या चाचण्या कराव्यात, असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोन ४१ नवीन रुग्ण

सद्य:स्थितीत १३४ रुग्णांवर उपचार चालू आहेत. ५ जानेवारी २०२२ या दिवशी कोरोनामुक्त रुग्णांची एकूण संख्या ५१ सहस्र ७६२ झाली आहे.

मुंबईत ४ सहस्र १९४ तीव्र कुपोषित बालके !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही कुपोषणाची समस्या तीव्र असणे हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !

गोव्यातील सर्व ४० आमदार कोट्यधीश !

‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ (ए.डी.आर्.) या संघटनेने गोवा विधानसभा निवडणुकीला सुमारे ३ मास असतांना सर्व ४० आमदारांची सविस्तर माहिती असलेला अहवाल प्रसिद्ध केला आहे. कोट्यवधी संपत्ती असलेले सर्वाधिक आमदार हे सत्ताधारी भाजपमध्ये आहेत.

गेल्या २० वर्षांत पोलीस कोठडीत १ सहस्र ८८८ जणांचा मृत्यू

पोलीस कोठडीत आरोपींना मारहाण केली जाते, तसेच त्यांचा छळ केला जातो, त्यात अनेकांचा मृत्यू होतो, तरीही या प्रकरणी कुणाला शिक्षा होत नाही, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! कोठडीतील मृत्यू म्हणजे पोलिसांनी केलेली हत्याच नव्हे का ? सरकारने याकडे गांभीर्याने पाहून उत्तरदायींना शिक्षा केली पाहिजे !

आज देशात होणार्‍या ‘राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणा’साठी महाराष्ट्रातील ७ सहस्र ३३० शाळांची निवड !

केंद्रीय शिक्षण विभागाने देशव्यापी ‘राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण’ करण्याचा निर्णय घेतला असून हे सर्वेक्षण देशभरात येत्या १२ नोव्हेंबर या दिवशी करण्यात येणार आहे. राज्यातील एकूण २ लाख ३४ सहस्र ५५ विद्यार्थी या सर्वेक्षणात सहभागी होणार आहेत.

भारत, अमेरिका यांच्यासह जगात पुरुषांमध्ये अविवाहित रहाण्याचा विचार होत आहे प्रबळ !

भारतात प्रत्येक घंट्याला २७ सहस्र, तर प्रत्येक मासाला ८ लाखांहून अधिक विवाह होत असतात; मात्र भारतासह जगभरात सध्याच्या पुरुषांमध्ये विवाह न करण्याचा विचार प्रबळ होत आहे, असे समोर आले आहे.

पुढील ९ वर्षांत जगातील ९ मोठी शहरे बुडणार !

‘क्लायमेट सेंट्रल’ नावाच्या प्रकल्पाच्या अंतर्गत एका अहवालात म्हटले आहे की, ‘समुद्राच्या पातळीत वाढ झाल्यास सर्वाधिक धोका कोणत्या शहरांना बसेल ?’ याची सूची या अहवालात देण्यात आली आहे. यामध्ये भारतातील कोलकाता शहराचा समावेश आहे.