ज्ञानवापी मशिदीचे संपूर्ण सर्वेक्षण १७ मे पूर्वी पूर्ण करा !

दिवाणी न्यायालयाचा आदेश

  • २ साहाय्यक न्यायालय आयुक्तांची नेमणूक

  • सर्वेक्षणाला विरोध करणार्‍यांवर कठोर कारवाई करणार

  • सर्वेक्षणानंतर ज्ञानवापी मशीद पूर्वीचे काशी विश्‍वानाथ मंदिर असल्याचे होणार उघड !

वाराणसी (उत्तरप्रदेश) – ज्ञानवापी मशीद आणि शृंगारगौरी मंदिर यांचे सर्वेक्षण आणि चित्रीकरण येत्या १७ मेच्या आत पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करा, असा आदेश येथील दिवाणी न्यायालयाने १२ मे या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी दिला. मुसलमान पक्षाकडून न्यायालय आयुक्त अजय कुमार मिश्रा यांना पालटण्याची केलेली मागणी न्यायालयाने फेटाळत न्यायालय आयुक्तांसमवेत आणखी २ साहाय्यक न्यायालय आयुक्तांची नेमणूक केली आहे. विशाल सिंह आणि अजय प्रताप हे साहाय्यक आयुक्त असणार आहेत. यासह ज्ञानवापी मशिदीचे टाळे उघडण्याचीही अनुमती देण्यात आली आहे. येथे असणार्‍या तळघराचे, तसेच प्रत्येक गोष्टीचे सर्वेक्षण करण्यास सांगितले आहे.  न्यायालयाच्या या आदेशानंतर १३ मे या दिवशी सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत पुन्हा सर्वेक्षण आणि चित्रीकरण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणाच्या वेळी प्रशासनाने सुरक्षा पुरवण्याचा आदेश दिला आहे. ‘या वेळी या सर्वेक्षणाला जे कुणी विरोध करण्याचा प्रयत्न करतील,त्यांच्यावर कारवाई केली जाईल’, अशी चेतावणीही न्यायालयाने आहे.   यापूर्वी ७ मे या दिवशी ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला विरोध करणार्‍या मुसलमानांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालय आयुक्त, दोन्ही पक्षांचे अधिवक्ता आणि याचिकाकर्ते उपस्थित होते.