‘गटार आणि रस्ते’ यांच्या पलीकडे जाऊन मानवाच्या विकासाकडे लक्ष देणे आवश्यक ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

पायाभूत सुविधांच्या विकासावरच भर देण्याऐवजी मानवाच्या विकासाकडे प्रत्येकाने लक्ष द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नवनिर्वाचित जिल्हा पंचायत सदस्यांना केले.

गोव्यातील बौद्ध धर्मियांना अनुसूचित जातीचा दर्जा मिळणार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यामध्ये विधानसभा संकुलातील सभागृहात पार पडलेल्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

नवीन प्रकारचा विषाणू ज्या वेगाने पसरतो, त्या प्रमाणात उपचार आणि चाचण्या यांची क्षमता ठेवा ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

नवीन प्रकारच्या कोरोनामुळे उपचाराची पद्धत याविषयी ‘टास्क फोर्स’ने अभ्यास करावा. नवीन प्रकारचा विषाणू ज्या वेगाने पसरतो, त्या प्रमाणात उपचार आणि चाचण्या यांची क्षमता ठेवा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे

भाजपचे नगरसेवक दया शंकर यांची नागपूर येथील महापौरपदी वर्णी

नागपूर शहराचे नवे महापौर म्हणून भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दया शंकर तिवारी असणार आहेत.

शिवप्रतापदिनाच्या निमित्ताने ठिकाठिकाणी शिवप्रतापाचा जागर !

मार्गशीर्ष शुक्ल पक्ष ७ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझलखानाचा वध केला. याला २१ डिसेंबर या दिवशी ३५२ वर्षे पूर्ण झाली. हा दिवस शिवप्रताप दिन म्हणून ओळखला जातो. या दिनाच्या निमित्ताने शिवप्रेमींनी ठिकठिकाणी शिवप्रतापाचा जागर केला.

वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते (बाबा) यांचा देहत्याग

हिंदु धर्माची बाजू परखडपणे मांडणारे, तसेच हिंदु धर्मावरील आघातांचे वेळोवेळी खंडण करणारे, सनातन संस्थेवर पित्याप्रमाणे प्रेम करणारे वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते (बाबा) यांनी त्यांच्या टाकळी या गावी देहत्याग केला.

गोभक्षकांच्या दबावाला शासनाने बळी पडू नये आणि गोवा मांस प्रकल्प चालू करू नये ! – गोव्यातील गोरक्षकांची शासनाकडे मागणी

गोवा शासनाने गोभक्षकांच्या दबावाला बळी पडू नये. उसगाव येथील गोवा मांस प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत चालू करू नये. शासनाने गोव्यातील गोवंशियांसाठी हानीकारक असे कोणतेही निर्णय घेऊ नयेत, अशी मागणी गोव्यातील गोरक्षकांनी शासनाकडे केली आहे.

३१ डिसेंबरच्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी आणि पोलीस यांना निवेदन

३१ डिसेंबरच्या मध्यरात्री घडणारे अपप्रकार रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

गोव्यात ‘निज गोंयकार मुस्लिम’ संघटनेची स्थापना

मुसलमानांच्या उद्धारासाठी मुसलमानांच्या एका गटाने ‘निज गोंयकार मुस्लिम’ संघटनेची स्थापना केली आहे. उद्योजक नितीन कुंकळ्ळेकर, दंततज्ञ डॉ. हर्बर्ट गोम्स आणि इतिहासतज्ञ प्रा. प्रजल साखरदांडे यांच्या उपस्थितीत या संघटनेची स्थापना करण्यात आली.

मराठीला राजभाषेचा दर्जा द्या अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडू ! – मराठी राजभाषा आंदोलनाची शासनाला चेतावणी

मराठीला राजभाषेचा दर्जा द्या अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडू, अशी चेतावणी ‘मराठी राजभाषा आंदोलन’ या संघटनेने शासनाला दिली आहे.