
पुणे – कोरोनाचा धोका अजून टळलेला नसल्याने सर्वांनी आरोग्याची काळजी घेऊनच म्हणजे सॅनिटायझर, मास्क, सामाजिक अंतर यांचे नियम पाळूनच शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती उत्सव साजरा करूया, असे आवाहन डॉ. राजेश देशमुख यांनी केले. शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती उत्सव साजरा करण्याविषयी जुन्नर पंचायत समिती येथील जिजामाता सभागृहात बैठक आयोजित केली होती. या बैठकीत पोलीस अधीक्षक, संबंधित अधिकारी, विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि शिवप्रेमी उपस्थित होते. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख म्हणाले की, शिवभक्तांनी शिवज्योत गडावर घेऊन जाऊ नये आणि मोठ्या प्रमाणावर गडावर गर्दी टाळावी, तसेच प्रशासनाला सहकार्य करावे.

राज्यशासनाकडून शिवजयंती साजरी करण्याविषयी मार्गदर्शक सूचनांप्रमाणे नियोजन करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले. तसेच सर्व विभागाच्या प्रमुखांसमवेत प्रत्यक्ष शिवनेरीवर जाऊन पहाणी करत विविध विकासकामांचा त्यांनी आढावा घेतला.
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !
‘महावितरण’कडून पुणे परिमंडलात १५ दिवसांत १ सहस्र २८१ वीजचोरांवर कारवाई !
पिंपरी-चिंचवड शहरातील नाल्यांवर झालेली अतिक्रमणे काढणार !
पुणे महापालिका समान आणि पुरेसे पाणीपुरवठा योजनेची ‘श्वेतपत्रिका’ काढणार का ?
आंतरराज्य समन्वय बैठकीतील निर्णयांची काटेकोर कार्यवाही करावी !