घरातून बाहेर पडतांना आणि घरी परत आल्यावर देवाला नमस्कार करण्याचे महत्त्व !
तुमच्या हातामध्ये भलेही लाख रुपयांचे घड्याळ असेल; परंतु त्यावर दाखवणारी वेळ ही फक्त त्या भगवंताच्याच हातात आहे.
तुमच्या हातामध्ये भलेही लाख रुपयांचे घड्याळ असेल; परंतु त्यावर दाखवणारी वेळ ही फक्त त्या भगवंताच्याच हातात आहे.
समाधान प्रपंचापासून शिकता येत नाही. ज्याच्याजवळ अगदी थोडे आहे त्याच्यापासून ते ज्याच्याजवळ अगदी पुष्कळ आहे त्याच्यापर्यंत, प्रत्येकाला काही तरी उणे-अधिक असणारच.
आपले जीवन देवाच्या हाती आहे आणि देव नामाच्या स्वाधीन आहे, हे पक्के लक्षात ठेवा. योगामध्ये योग करेपर्यंतच समाधान असते; पण नामस्मरणाच्या अनुसंधानात सतत समाधान असते.
आयुष्य चालले आहे, उद्याचा भरवसा नाही, तेव्हा आता सगळे सोडून नामाला घट्ट धरा.
प्रपंच करत असतांना त्याची आसक्ती अल्प होऊन भगवंताचे प्रेम येण्यासाठी, शास्त्रांनी घालून दिलेली बंधने आम्ही पाळली पाहिजेत.
आपले जीवन देवाच्या हाती आणि देव नामाच्या स्वाधीन आहे’, हे पक्के लक्षात ठेवा.
ज्याने जगताची आस सोडली आणि रामाची सेवा पत्करली, तो जगाचा स्वामी होईल.
भाव असल्याविना परमार्थ होत नाही. प्रपंचात जसा पैसा लागतो, त्याप्रमाणे परमार्थात भाव लागतो. प्रपंचात पैशाविना चालूच शकत नाही. परमार्थही भाव असल्याविना होत नाही. जसा तुमचा भाव असेल, त्याप्रमाणे तुम्हाला देवाची प्राप्ती होईल.
भगवंत आपलासा करून घेण्याचा प्रयत्न करावा. अभिमान सोडून जर असा प्रयत्न चालू ठेवला, तर सद्गुरूंची कृपा झाल्याविना रहात नाही.
‘भोग प्रारब्धाने येतात’, असे म्हणण्यापेक्षा ते भगवंताच्या इच्छेने येतात’, असे म्हटले की, समाधान मिळेल.