Canada Hindus Death Threats : कॅनडामध्ये हिंदूंना मिळत आहेत खंडणीसाठी ठार मारण्याच्या धमक्या !

‘कॅनडा म्हणजे हिंदूंसाठी असुरक्षित देश’, असे आता भारताने घोषित केले पाहिजे आणि भारततियांना तेथे जाण्यास बंदी घातली पाहिजे !

Ruby Khan Death Threat : घरात श्रीरामाची पूजा केल्याने भाजपच्या पदाधिकारी रुबी खान यांना धर्मांधांकडून ठार मारण्याची धमकी !

धर्मांधांचा सर्वधर्मसमभाव ! याविषयी देशातील निधर्मीवादी कदापि तोंड उघडणार नाहीत, हे जाणा !

Gautam Adani : उद्योगपती गौतम अदानी आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती !

उद्योगपती गौतम अदानी आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती बनले आहेत, तर जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या सूचीमध्ये ते १२ व्या स्थानावर पोचले आहेत. श्रीमंतांच्या सूचीत त्यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांना मागे टाकले आहे.

Central Drug Regulatory Board : रक्ताच्या पिशवीसाठी आता केवळ प्रक्रियेवर झालेला खर्चच घेण्यात येणार !

केंद्रीय औषध नियामक मंडळाने रक्ताच्या पिशव्या पैसे घेऊन विकण्यावर बंदी घातली आहे. यामुळे आता रक्तपेढ्या किंवा रुग्णालये यांना रक्ताची विक्री करता येणार नाही.

National Crime Records Bureau : ‘हिट अँड रन’च्या प्रकरणात बहुतांश आरोपी निर्दोष सुटतात ! – राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभाग

गेल्या ५ वर्षांत हिट अँड रनच्या प्रलंबित प्रकरणांची संख्या वाढली आहे. वर्ष २०१८ मध्ये प्रलंबितचे प्रमाण ९०.४ टक्के होते, तर वर्ष २०२२ मध्ये वाढून ९३ टक्के झाले.

मंदिर १६१ फूट उंच असून त्यात ३९२ खांब आणि ४४ प्रवेशद्वार !

श्रीरामाच्या भव्य मंदिराचे येत्या २२ जानेवारी या दिवशी उद्घाटन होऊन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर मंदिराचे वैशिष्ट्यांची तपशीलवार माहिती, तेथील सोयी-सुविधा आदी माहिती श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने ‘एक्स’वर पोस्ट करून दिली आहे.

Shriram Janmabhumi Verdict : श्रीरामजन्मभूमीचा निर्णय सर्व न्यायमूर्तींनी एकमताने दिला होता ! – सरन्यायाधीश चंद्रचूड

अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीच्या संघर्षाचा दीर्घ इतिहास आणि विविध पैलू लक्षात घेऊन या खटल्याशी संबंधित सर्व न्यायमूर्तींनी एकमत घेऊन निर्णय दिला होता, अशी माहिती सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत दिली.

Road Potholes : गोपालगंज (बिहार) येथे उड्डाणपुलावरील खड्ड्यांमुळे अपघात झाल्याने न्यायाधीश आणि त्यांची आई गंभीररित्या घायाळ

रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या प्राणघातक आहे, हे प्रशासनाला कधी कळणार ? यास उत्तरदायी असणार्‍यांना आता फाशीचीच शिक्षा द्यायला हवी, अशी कुणी मागणी केली, तर त्यात चुकीचे ते काय ?

Guinness World Record : गुजरातमध्ये एकाच वेळी ४ सहस्रांहून अधिक नागरिकांकडून सूर्यनमस्कार !

मेहसाना येथील मोढेरा सूर्य मंदिरासह १०८ ठिकाणी १ जानेवारी या दिवशी एकाच वेळी ४ सहस्रांहून अधिक नागरिकांनी सूर्यनमस्कार घालून ‘गिनिज बूक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नवा विक्रम नोंदवला.

मराठवाड्यात वर्ष २०२२ पेक्षा २०२३ मध्ये धर्मांतराच्या प्रमाणात वाढ !

धर्मांतराचे वाढते प्रकार पहाता धर्मांतरबंदी कायदा त्वरित लागू करणे आवश्यक आहे ! यासह हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे !