श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दिली श्रीराममंदिराची तपशीलवार माहिती !
अयोध्या (उत्तरप्रदेश) – श्रीरामाच्या भव्य मंदिराचे येत्या २२ जानेवारी या दिवशी उद्घाटन होऊन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मंदिराचे वैशिष्ट्यांची तपशीलवार माहिती, तेथील सोयी-सुविधा आदी माहिती श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने ‘एक्स’वर पोस्ट करून दिली आहे. ही माहिती खालील प्रमाणे आहे.
अयोध्या में निर्माणाधीन श्रीराम जन्मभूमि मंदिर की विशेषताएं:
1. मंदिर परम्परागत नागर शैली में बनाया जा रहा है।
2. मंदिर की लंबाई (पूर्व से पश्चिम) 380 फीट, चौड़ाई 250 फीट तथा ऊंचाई 161 फीट रहेगी।
3. मंदिर तीन मंजिला रहेगा। प्रत्येक मंजिल की ऊंचाई 20 फीट रहेगी। मंदिर में कुल… pic.twitter.com/BdKNdATqF6
— Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra (@ShriRamTeerth) January 4, 2024
१. अयोध्येतील श्रीराममंदिर पारंपरिक नगर शैलीत बांधले जात आहे.
२. मंदिराची लांबी (पूर्वेकडून पश्चिमेकडे) ३८० फूट असून रुंदी २५० आणि उंची १६१ फूट असणार आहे.
३. हे मंदिर ३ मजली असणार आहे. प्रत्येक मजल्याची उंची २० फूट असेल.
४. मंदिरामध्ये एकूण ३९२ खांब असतील आणि ४४ प्रवेशद्वार असतील.
५. मुख्य गर्भगृहामध्ये भगवान श्रीरामाचे बालस्वरूप, तर पहिल्या मजल्यावर श्रीराम दरबार असेल.
६. मंदिरामध्ये नृत्यमंडप, रंगमंडप, सभामंडप, प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप असे ५ मंडप असतील.
७. मंदिरातील खांबांवर आणि भिंतींवर देवतांच्या मूर्ती कोरल्या जात आहेत.
८. मंदिरात पूर्वेकडे असणार्या सिंहद्वाराद्वारे ३२ पायर्या चढून प्रवेश करता येईल.
९. मंदिरप्रवेशासाठी अपंग आणि वृद्धांसाठी ‘रॅम्प’, तसेच उद्वाहन यांची व्यवस्था असणार आहे.
१०. मंदिराभोवती एक आयताकृती भिंत असेल. त्याची चारही दिशांची एकूण लांबी ७३२ मीटर आणि रुंदी १४ फूट असेल.
११. मंदिराभोवती असणार्या उद्यानाच्या ४ कोपर्यांवर सूर्यदेव, माता भगवती, गणपति आणि भगवान शंकर यांना समर्पित अशी ४ मंदिर बांधली जातील. उत्तरेला श्री अन्नपूर्णेचे तर दक्षिणेला श्री हनुमानाचे मंदिर असेल.
१२. मंदिराजवळ पौराणिक काळातील सीताकूप असेल.
१३. मंदिर संकुलातील प्रस्तावित इतर मंदिरे ही महर्षि वाल्मीकि, महर्षि वशिष्ठ, महर्षि विश्वामित्र, महर्षि अगस्त्य, निषादराज, माता शबरी आणि ऋषिपत्नी देवी अहिल्या यांना समर्पित असतील.
१४. दक्षिण-पश्चिम भागातील भगवान शिवाच्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करून तिथे जटायूची मूर्ती बसवण्यात आली आहे.
१५. श्रीराममंदिराच्या बांधकामामध्ये लोखंडाचा वापर केला जाणार नाही, तसेच भूमीवर काँक्रीटही केले जाणार नाही.
१६. मंदिराच्या खाली १४ मीटर जाडीचा ‘रोलर कॉम्पॅक्टेड काँक्रीट’ (आर्.सी.सी.) टाकण्यात आले आहे. त्याला कृत्रिम खडकाचे स्वरूप देण्यात आले आहे.
१७. मातीच्या ओलाव्यापासून मंदिराचे रक्षण करण्यासाठी ग्रॅनाईटचा २१ फूट उंच मंडप बांधण्यात आला आहे.
१८. मंदिर संकुलामध्ये सांडपाणी प्रक्रियेचा आणि जलशुद्धीकरण प्रक्रियेचा प्रकल्प असतील. तसेच अग्नीशमनदलासाठी पाण्याची व्यवस्था आणि स्वतंत्र ‘वॉटर स्टेशन’ यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
१९. मंदिराजवळच २५ सहस्र लोकांना सुविधा व्हावी, यासाठी केंद्र बांधले जात असून येथे भाविकांच्या सामानासाठी लॉकरची सुविधा, तसचे वैद्यकीय सुविधाही असेल.
२०. मंदिर परिसरातच स्नानगृह, स्वच्छतागृह, वॉश बेसीन आदी सुविधा असतील.
२१. मंदिर पूर्णपणे भारतीय परंपरेनुसार आणि स्वदेशी तंत्रज्ञानाने बांधले जात आहे. येथे पर्यावरण आणि जलसंवर्धन यांवर विशेष लक्ष दिले जात असून यामुळे ७० एकर क्षेत्रापैकी ७० टक्के क्षेत्र नेहमी हिरवेगार राहील.