Ruby Khan Death Threat : घरात श्रीरामाची पूजा केल्याने भाजपच्या पदाधिकारी रुबी खान यांना धर्मांधांकडून ठार मारण्याची धमकी !

अलीगड (उत्तरप्रदेश) येथील घटना !

रुबी खान

अलीगड (उत्तरप्रदेश) – भाजपच्या जयगंज विभागाच्या उपाध्यक्षा रुबी आसिफ खान यांनी घरामध्ये ४ जानेवारी या दिवशी श्रीरामाची पूजा केल्याने धर्मांधांनी त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. धमकीचे पत्र त्यांच्या घरी टाकण्यात आले आहे. या पत्रामध्ये लिहिण्यात आल आहे की, तुम्ही रामाचे भक्त झाला आहात. पुढील ७२ घंट्यांत तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना ठार मारले जाईल.

या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली असून पोलिसांनी अन्वेषण चालू केले आहे. सीसीटीव्हीमध्ये काही अज्ञात खान यांच्या घरात पत्र फेकतांना आढळून आले आहे. पोलीस आता त्यांचा शोध घेत आहेत.

संपादकीय भूमिका 

धर्मांधांचा सर्वधर्मसमभाव ! याविषयी देशातील निधर्मीवादी कदापि तोंड उघडणार नाहीत, हे जाणा !