मराठवाड्यात वर्ष २०२२ पेक्षा २०२३ मध्ये धर्मांतराच्या प्रमाणात वाढ !

  • इस्लाम स्वीकारणार्‍यांमध्ये पुरुषांची संख्या दुप्पट !

  • ३० हिंदूंनी स्वीकारला बौद्ध धर्म !

छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्यात वर्ष २०२२ च्या तुलनेत वर्ष २०२३ मध्ये धर्मांतराचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. इस्लाम स्वीकारणार्‍यांमध्ये पुरुषांची संख्या दुप्पट असून ३० हिंदूंनी बौद्ध धर्म स्वीकारला आहे. धर्म पालटलेल्या नागरिकांनी सरकारी राजपत्रात (गॅझेटमध्ये) प्रकाशित केलेल्या विज्ञापनांनुसार वर्ष २०२२ मध्ये मराठवाड्यात धर्मांतराच्या ४८ घटना घडल्या. वर्ष २०२३ मध्ये ५६ नागरिकांनी त्यांचा धर्म पालटला आहे. व्यवसाय, स्वेच्छा, प्रभाव, स्वेच्छा, इस्लाम पंथांचे विचार आवडणे आदी कारणांमुळे धर्मांतर केले जात आहे.

१. गेल्या वर्षी मराठवाड्यात १५ पुरुष आणि ४ महिला यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. यंदा बौद्ध होणार्‍यांचे प्रमाण ३४ इतके आहे. त्यात ३० पुरुष आणि ४ महिला यांचा समावेश आहे.

२. एरव्ही प्रेमसंबंध किंवा विवाह यांमुळे हिंदु मुली मुसलमान होतात; मात्र सरकारी आकडेवारीनुसार गेल्या वर्षभरात ९ हिंदु पुरुषांनी मुसलमान धर्म स्वीकारला आहे. वर्ष २०२२ ५ जणांनी मुसलमान धर्म स्वीकारला होता.

संपादकीय भूमिका 

धर्मांतराचे वाढते प्रकार पहाता धर्मांतरबंदी कायदा त्वरित लागू करणे आवश्यक आहे ! यासह हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे !