कानपूर (उत्तरप्रदेश) येथील सरकारी कार्यालयातील धारिका (फाईल्स) स्वच्छता कर्मचार्‍यांनी रद्दीत विकल्या !

स्वच्छता कर्मचारी अशा प्रकारचे कृत्य करत असतांना वरिष्ठ अधिकारी आणि सुरक्षारक्षक झोपले होते का ?

उत्तराखंडच्या नैनितालची भूमीही खचू लागल्याने २५० घरे केली जात आहेत रिकामी !

उत्तराखंडच्या जोशी मठ भागामध्ये भूस्खलनामुळे घरांना भेगा पडत असल्याने तेथील लोकांना स्थलांतरित करण्याच्या घटनेनंतर आता राज्यातील नैनिताल येथील भूमीही खचत असल्याचे समोर आले आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे गणेशोत्सव मंडळांचा धार्मिक देखाव्यांवर भर !

गेल्या अनेक वर्षांपासून देखाव्यांची परंपरा जपणार्‍या शहरातील जुन्या गणेशोत्सव मंडळांनी यावर्षी धार्मिक देखाव्यांवर भर दिला आहे. मंडळांनी अयोध्येतील श्रीरामाचे मंदिर, केदारनाथचा आदियोगी, चंद्रयान, शिवराज्याभिषेकाचे देखावे सिद्ध केले आहेत.

पट्टेरी वाघाचे कातडे आणि नखांची तस्करी करणार्‍या महाबळेश्वरच्या ३ जणांना अटक

महाबळेश्वरच्या जंगलात पट्टेरी वाघ आहेत का ? असतील तर नेमकी त्यांची शिकार कुणी केली ? राष्ट्रीय प्राणी पट्टेरी वाघाच्या कातड्याची आणि नखांची तस्करी होत असतांना वनविभागाचे अधिकारी अन् कर्मचारी अनभिज्ञ कसे ?

पैशाच्या संपत्तीपेक्षा बुद्धीची संपत्ती महत्त्वाची ! – प.पू. मोहन भागवत, सरसंघचालक

पैशाच्या संपत्तीपेक्षा बुद्धीची संपत्ती महत्त्वाची आहे, हा भारतीय संस्कृतीतील विचार विसरता कामा नये. स्वत:च्या उपभोगासाठी, भविष्याची तरतूद, धार्मिक कार्यासाठी, समाजासाठी, राज्यकर्त्यांसाठी आणि आवश्यकतेच्या प्रसंगी संपत्तीचे समान भाग करावे, असे आवाहन सरसंघचालक प.पू. मोहन भागवत यांनी केले.

लालबागचा राजाच्‍या मंडपात भाविक आणि पदाधिकारी यांमध्‍ये हाणामारी !

शहरातील लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळाच्‍या मंडपात पदाधिकारी आणि भाविक यांमध्‍ये हाणामारी झाल्‍याची दुर्दैवी घटना घडली.

कर्नाटकमधील सरकारी शाळेत विद्यार्थिनीने श्री गणेशाची पूजा केल्याने शिक्षिकेकडून मारहाण !

कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यापासून हिंदूंवर सातत्याने अत्याचार केले जात आहेत. काँग्रेसला सत्तेवर बसवणार्‍या हिंदूंना हे मान्य आहे का ?

भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांना आता परदेशात करता येणार रुग्णांवर उपचार !

जागतिक वैद्यकीय शिक्षण महासंघाने भारताच्या ‘नॅशनल मेडिकल कमिशन’ला १० वर्षांसाठी मान्यता दिली आहे. यामध्ये भारतातील ७०६ वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.

गुजरात उच्च न्यायालयाने एका सुनावणीच्या वेळी दिला स्कंद पुराणाचा संदर्भ !

गुजरात उच्च न्यायालयाने एका प्रकरणाची सुनावणी करतांना स्कंद पुराणाचा संदर्भ दिला. अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्यानंतर ती गरोदर राहिल्याने तिने गर्भपात करावी, असे तिच्या आई-वडिलांची इच्छा होती.

नाशिक जिल्‍ह्यात कांदा लिलाव बंद, सर्व १७ बाजार समित्‍यांना टाळे !

कांदा व्‍यापार्‍यांनी विविध मागण्‍यांसाठी लासलगावसह नाशिक जिल्‍ह्यातील १७ बाजार समित्‍यांमधील लिलावात २० सप्‍टेंबरपासून सहभागी न होण्‍याचा निर्णय घेतला आहे. लिलाव बंदमुळे शेतकर्‍यांची कोंडी झाली असून अंदाजे ३० ते ४० कोटी रुपयांची उलाढाल थंडावली आहे.