Global Death Penalty : वर्ष २०२३ मध्ये जगभरात १ सहस्र १५३ लोकांना फाशी !

  • मृत्यूदंडाच्या शिक्षेत ३० टक्क्यांनी वाढ

  • इराणमध्ये ८५३ जणांना मृत्यूदंड

लंडन – ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल‘ने नुकताच जगभरात देण्यात येणार्‍या मृत्यूदंडाच्या शिक्षेविषयीचा अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात म्हटले आहे की, वर्ष २०२३ मध्ये जगभरात १ सहस्र १५३ लोकांना फाशी देण्यात आली. त्यांपैकी सर्वाधिक ८५३ जणांना इराणमध्ये फाशी देण्यात आली. वर्ष २०२२ च्या तुलनेत वर्ष २०२३ मध्ये जगभरात मृत्यूदंडाची शिक्षा देण्याच्या प्रमाणात ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. चीनमध्ये सहस्रावधी लोकांना फाशी देण्यात आली आहे; मात्र चीनने अधिकृत आकडेवारी न दिल्याने चीनचा या सूचीत समावेश नाही, असे या अहवालात म्हटले आहे.

इराणमध्ये लहान गोष्टींसाठीही मृत्यूदंडाची शिक्षा !

‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल‘चे सरचिटणीस एग्नेस कॅलामार्ड यांनी म्हटले आहे की, इराणमध्ये प्रत्येक लहान गोष्टीसाठी मृत्यूदंडाची शिक्षा आहे. विशेषतः गरीब बलुच समुदायातील लोकांना भेदभावपूर्ण पद्धतीने फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. इराणनंतर फाशीची शिक्षा देणार्‍या देशांमध्ये सौदी अरेबिया, सोमालिया आणि अमेरिका यांचा समावेश आहे.