लेस्टर (ब्रिटन) येथे श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी अहमद नावाच्या पोलिसाकडून हिंदु पुजार्‍याशी अयोग्य वर्तन !

लेस्टरमध्येच धर्मांध मुसलमानांनी काही मासांपूर्वी हिंदूंवर आक्रमण केले होते आणि पोलीस मूकदर्शक राहिले होते ! या पोलिसांमध्ये सर्वच ‘अहमद’ भरले आहेत, असेच आता या घटनेनंतर वाटू लागले आहे !

भारताने कॅनडाच्या नागरिकांसाठी व्हिसा सेवा थांबवली !

कॅनडात झालेल्या खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येवरून कॅनडा आणि भारत यांच्यात चालू झालेल्या वादातून आता भारताने कॅनडाच्या नागरिकांना व्हिसा देण्याचे तात्पुरते थांबवण्यात आल्याची घोषणा केली आहे.

खलिस्तानचे समर्थन करणारा गायक शुभनीत सिंह याच्या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व ‘बोट’ आस्थापनाने काढले !

बोट आस्थापनाचे अभिनंदन ! खलिस्तान्यांवर आता देशभरातून बहिष्कार घालण्यास प्रारंभ झाल्यावर ते ताळ्यावर येतील !

सामाजिक माध्यमे वापरण्यासाठी वयोमर्यादा निश्‍चित करायला हवी ! – कर्नाटक उच्च न्यायालयाची सूचना

हे न्यायालयाला का सांगावे लागते ? सरकारला स्वतःला ते कळत का नाही ?

पंतप्रधान मोदी यांच्याकडून देशवासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा !

‘सर्व देशवासियांना श्री गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. गणपति बाप्पा मोरया !’, अशा शब्दांत मराठीतून ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

उज्‍जैन आणि ओंकारेश्‍वर येथे महाराष्‍ट्रातील पर्यटक अडकल्‍याची भीती !

मध्‍यप्रदेशातील दक्षिण भागात गेल्‍या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला आहे. त्‍यामुळे नर्मदा आणि क्षिप्रा नदीने धोक्‍याची पातळी ओलांडली आहे. ओंकारेश्‍वर जलाशयातील पाण्‍याचा मोठा विसर्गही नर्मदा नदीमध्‍ये सोडण्‍यात आला आहे.

पवना बंदिस्‍त जलवाहिनी प्रकल्‍प कायमस्‍वरूपी बंद करण्‍यासाठी ठाकरे गटाचा ‘शेतकरी जनआक्रोश मोर्चा’ !

पवना बंदिस्‍त जलवाहिनी प्रकल्‍प कायमस्‍वरूपी बंद करावा, पुन्‍हा कार्यान्‍वित करू नये, या मागणीसाठी मावळ तालुका उद्धव ठाकरे पक्षाच्‍या वतीने पवनानगर येथे ‘शेतकरी जनआक्रोश मोर्चा’ काढण्‍यात आला.

मराठा समाजाला आरक्षण मिळण्‍यासाठी सांगलीत भव्‍य मोर्चा !

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या तसेच अन्‍य मागण्‍यांसाठी मराठा समाजाच्‍या वतीने भव्‍य मोर्चा काढण्‍यात आला. यात १ लाखांपेक्षा अधिक नागरिक सहभागी झाले होते. शहरातील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्‍या पुतळ्‍याला पुष्‍पहार अर्पण करून या मोर्चाला प्रारंभ झाला.

आगामी काळातील सार्वजनिक सण, उत्‍सव मंगलमय वातावरणात, शांततेत साजरे करा ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

सार्वजनिक गणेशोत्‍सव हा राज्‍यातील मोठा उत्‍सव आहे. आगामी काळातील येणारे सर्व सण आणि उत्‍सव जल्लोषात, गुण्‍यागोविंदाने, भक्‍तीभावाने आणि मंगलमय वातावरणात कोणतेही गालबोट न लागता साजरे करावेत, असे आवाहन मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

‘पाश्‍चात्त्य देश वाईट आहेत’, या मानसिकतेतून बाहेर पडले पाहिजे ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

माझ्या मते आपल्याला ‘पाश्‍चात्त्य देश वाईट आहेत’, ‘ते विकसनशील देशांच्या विरोधात आहेत’ या भूतकाळातील घटनांतून निर्माण झालेल्या मानसिकतेतून बाहेर आले पाहिजे, असे आवाहन भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी येथे केले.