Pope Francis  More Babies: इटलीतील नागरिकांनी अधिकाधिक मुलांना जन्माला घालावे  ! – पोप फ्रान्सिस

गर्भनिरोधकच्या व्यवसायावर टीका !

रोम (इटली) – ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी इटली आणि युरोप येथील लोकसंख्येच्या संकटावर चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, इटालियन लोकांनी अधिकाधिक मुले जन्माला घातली पाहिजेत. या वेळी त्यांनी गर्भनिरोधक व्यवसायावरही टीका केली. इटली हा जगातील सर्वांत अल्प जन्मदर असलेल्या देशांपैकी एक आहे. गेल्या वर्षी येथे केवळ ३ लाख ७९ सहस्रे बालके जन्माला आली.

पोप पुढे म्हणाले की,

१. जन्माला आलेल्यांची संख्या हा आशेचा पहिला किरण असतो. मुले आणि तरुण यांच्याखेरीज कोणताही देश उज्जवल भविष्याची इच्छा गमावून बसतो.

२. जोडप्यांना अपत्यप्राप्तीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी दीर्घकालीन राजकीय धोरण अवलंबण्याची आवश्यकता आहे.

३. महिलांना मातृत्व आणि ‘करिअर’ (भवितव्य) हे दोन्ही करता येण्यासाठी धोरण आखले गेले पाहिजे. कामाची पद्धत सुलभ करण्याचे, तसेच आणि घर खरेदीमधील अडथळे दूर करण्याचेही आवाहन पोप यांनी केले.

४. युरोपमधील घरे सामानाने भरलेली; परंतु मुलांअभावी रिकामी आहेत.

संपादकीय भूमिका

एरव्ही असे आवाहन करणार्‍या हिंदूंवर तुटून पडणारी धर्मनिरपेक्षतावादी जमात आता पोप यांच्या या विधानाविषयी गप्प का ?