राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यास शासनाची अनुमती

राज्यातील ऊस गाळप हंगामाचे कारण पुढे करत ३ मासांसाठी सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली होती. ही स्थगिती राज्य सरकारने २ फेब्रुवारीला मागे घेतली आहे.

प्रतिवर्षी २६ जुलैला वृद्धांच्या सन्मानार्थ दिन साजरा करणार ! – पोप फ्रान्सिस यांची घोषणा

पोप फ्रान्सिस यांनी २६ जुलै हा दिवस आजी आजोबा आणि वृद्ध यांच्या सन्मानार्थ साजरा करण्याची घोषणा केली. ‘नेहमी आपण आजी आजोबांना विसरतो; मात्र त्यांच्याकडे जीवन जगण्याचा मोठा अनुभव मिळू शकतो’, असे ते म्हणाले.

आध्यात्मिक स्तरावरील साहाय्य, हेच खरे साहाय्य ! – सौ. ड्रगाना किस्लौस्की

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाद्वारे वैज्ञानिक परिषदांमध्ये सादर करण्यात आलेला हा ६६ वा शोधनिबंध होता. यापैकी ४ आंतरराष्ट्रीय परिषदांतील शोधनिबंधांना ‘सर्वोत्कृष्ट शोधनिबंध’ पुरस्कार प्राप्त झाला आहे.

रायगड किल्ल्यावर लग्नापूर्वीचे चित्रीकरण; शिवप्रेमींमध्ये संताप

रायगड किल्ल्यावर लग्नापूर्वीचे जोडप्यांचे चित्रीकरण करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संताप निर्माण झाला आहे. होळीचा माळ, किल्ल्यावरील बाजारपेठ परिसरात जोडप्यांना घेऊन चित्रीकरण करण्यात आल्याची ध्वनीचित्रफीत समोर आली आहे.

धनंजय मुंडे आणि त्या महिलेचा वाद मध्यस्थांच्या वतीने मिटवण्यात येणार

मुंडे आणि महिला यांच्या वतीने न्यायमूर्ती ए.के. मेनन यांच्यासमोर परस्पर सहमतीची सूत्रे सादर करण्यात आली.

चंद्राचा झोप आणि मासिक पाळी यांच्यावर होतो परिणाम ! – संशोधकांचा निष्कर्ष

उत्तर अर्जेंटिनातील फोर्मोसा भागातील टोबा-कूम हा आदिवासी समुदाय आणि सिएटलमधील साडेसात लाखांहून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना यात सहभागी करून घेण्यात आले होते. त्यांचे निरीक्षण करून हे संशोधन करण्यात आले आहे.

सामाजिक कार्यकर्त्यांसाठी आरोग्य दिनदर्शिका अत्यंत मोलाची ! – डॉ. अनिल माळी, जिल्हा शल्यचिकित्सक

दिनदर्शिकेच्या विक्रीतून मिळणारी रक्कम ही अंध विद्यार्थ्यांना बोलणारी घड्याळे देण्यासाठी वापरण्यात येणार आहे.

साम्यवाद , लोकशाही आणि विज्ञानवाद यांच्या मर्यादा स्पष्ट झाल्याने देशाला नवी दिशा शोधावी लागेल ! – गिरीश पुजारी, मुख्य समुद्री अभियंता

साम्यवादी विचारातून हुकूमशाही, लोकशाही मार्गाने भांडवलशाही, तसेच विज्ञानवादाने भोगवाद निर्माण होत आहे. हे आज स्पष्ट झाल्याने देशाला नवी दिशा शोधावी लागेल.

जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी कटीबद्ध ! – पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी मी सदैव तत्पर आणि कटीबद्ध रहाणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण सोहळ्याच्यावेळी ते बोलत होते.

२ वर्षांत राज्यातील २३ मराठी प्राथमिक शाळा बंद

राज्यात मागील २ वर्षांत २३ मराठी प्राथमिक शाळा बंद झाल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत शिक्षणमंत्री या नात्याने बोलतांना दिली. विधानसभेत उपस्थित प्रश्‍नाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उत्तर देत होते.