
मुंबई – येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपति मंदिरात दर्शनासाठी येणार्या प्रत्येक भाविकाला दर्शन घेतल्यानंतर श्री गणेशाचा आशीर्वाद म्हणून टिळा लावण्याचा स्तुत्य निर्णय मंदिर प्रशासनाने नुकताच घेतला आहे. या निर्णयाचे महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने अभिनंदन ! अशाच प्रकारे राज्यातील अन्य मंदिरांमध्येही कपाळावर टिळा लावण्याचा निर्णय संबंधित मंदिर विश्वस्त तथा मंदिर प्रशासन यांनी घ्यावा, असे आवाहन ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ने केले आहे.
हिंदु धर्मात कपाळी टिळा लावण्याला विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे. कपाळावर टिळा लावण्याने भक्ताला त्या देवतेची शक्ति आणि चैतन्य यांचा लाभ होतो, तसेच त्या त्या देवाप्रती भक्तीभाव वाढण्यास साहाय्य होते. त्यामुळे श्री सिद्धिविनायक मंदिराच्या कृतीचे अन्य सर्व मंदिरे अनुकरण करतील, अशी आशा आहे, असे मंदिर महासंघाने म्हटले आहे.
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
अनुमतीविना म्हादई वन्यजीव अभयारण्यात प्रवेश करणार्या ५ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंद
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
‘स्मार्ट मीटर’विषयीच्या अफवांवर विश्वास न ठेवता ग्राहकांनी सहकार्य करावे ! – महावितरणचे आवाहन
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात