मुंबई, २४ सप्टेंबर – लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबईतील प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिराच्या कार्यकारिणीत पालट करण्यात आला आहे. विश्वस्त मंडळाच्या कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या नंदा राऊत यांच्या जागेवर वीणा मोरे-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नंदा राऊत यांच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले होते, तसेच त्यांच्या चौकशीचीही मागणी करण्यात आली होती. वीणा मोरे-पाटील सध्या शालेय शिक्षण विभागाच्या अपर सचिव पदावर कार्यरत आहेत.