पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने कोरोना केंद्रांना आर्थिक पाठबळ आणि गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप !

५ लाख रुपयांचे ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर’ आणि १ सहस्र नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखालीच आगामी महापालिका निवडणूक लढवणार ! -प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची माहिती

पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १० जून या दिवशी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.

उंचगाव येथे डेंग्यूसह चिकनगुनिया सदृष्य आजार मोठ्या प्रमाणात पसरत असल्याने तातडीने उपाययोजना करा ! – करवीर शिवसेनेचे आरोग्याधिकार्‍यांना निवेदन

प्रशासन स्वतःहून जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असणार्‍या कृती लगेच का करत नाही ?

‘बाळकडू’ चित्रपटाच्या महिला निर्मात्याला अटक !

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित बाळकडू चित्रपटाच्या निर्मात्या आधुनिक वैद्या स्वप्ना पाटकर यांना फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी अटक केली आहे.

संकटकालीन साहाय्यासाठी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यात सुसंवाद असावा ! – खासदार संजय राऊत, शिवसेना

नवीन सत्तासमीकरणांचा इथे विषय येत नाही. केंद्र आणि राज्य यांच्यात संघर्ष नसावा. केंद्र सरकार राज्याचे पालक म्हणून काम करत असते. राज्यांच्या संकटकाळात पंतप्रधानांनी साहाय्य करावे, ही राज्यांची भूमिका आहे.

वृद्ध पत्नीला मारणारे गजानन चिकणकर पोलिसांच्या कह्यात !

पाणी भरण्याच्या वादातून स्वतःच्या पत्नीला लाथाबुक्क्यांनी आणि बालदीने मारहाण करणारे कल्याण येथील गजानन चिकणकर यांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. त्यांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला होता.

बी-बियाणे देण्यासाठी असलेल्या ‘ऑनलाईन’ नोंदणीची जाचक अट रहित करा ! – संभाजीराव भोकरे, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना

सध्या ग्रामीण भागात वीज मोठ्या प्रमाणात कधीही जाते. यामुळे ‘सर्व्हर’ वारंवार ‘डाऊन’ होत आहेत, तसेच ‘महा-ई-सेवा केंद्र’, संगणक सुविधा केंद्र बंद आहेत.

कोल्हापूर शिवसेनेच्या वतीने शिवराज्याभिषेकदिन सोहळा उत्साहात !

श्री. राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवराज्याभिषेकदिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.

शिवस्वराज्य दिनाच्या पार्श्वभूमीवर करवीर शिवसेनेकडून उंचगाव ग्रामपंचायतीस शिवराज्याभिषेक सोहळ्याचे छायाचित्र प्रदान

या वेळी करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, सर्वश्री दिपक पाटील, बाळासाहेब नलवडे, प्रफुल्ल घोरपडे, युवासेनेचे सचिन नागटीळक उपस्थित होते.

राज्य सरकारला मराठा आरक्षणाविषयी सर्वोच्च न्यायालयात मुद्दे मांडता न आल्याने आरक्षण मिळाले नाही ! – खासदार नारायण राणे यांची टीका 

शिवसेनेने आरक्षणाला कधीही पाठिंबा दिला नाही; कारण त्यांना आरक्षण द्यायचे नव्हते.