तौक्ते चक्रीवादळामुळे हानी झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर आमदार वैभव नाईक यांच्याकडून सिंधुदुर्ग किल्ल्याची पहाणी

शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाऊन पहाणी केली आणि तेथील रहिवाशांची विचारपूस केली

वर्धा येथील शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख नीलेश देशमुख यांना खंडणीच्या गुन्ह्यात अटक !

आर्वी ते कौंडण्यापूर रस्त्याचे काम करणार्‍या अमरावती येथील ‘शैलेश इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड’ या आस्थापनाने केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

शिवसेना शाखाप्रमुख कै. किरण माने यांच्या स्मरणार्थ ‘आयसोलेशन रुग्णालयास’ विनामूल्य ‘पीपीई किट’ वाटप !

या वेळी शिवसेना युवासेनेचे मंजित माने यांच्यासह विवेक जाधव,  मंजीत माने, वैभव जाधव, संदेश इंगवले उपस्थित होते.

शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांना न्यायालयाकडून ६ मासांची शिक्षा !

वर्ष २०१८ मध्ये शहरात झालेल्या हिंदु-मुसलमान जातीय दंगलीच्या वेळी सरकारी कामात अडथळा आणल्याच्या प्रकरणी येथील शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांना जिल्हा सत्र न्यायालयाने ६ मासांची शिक्षा आणि ५ सहस्र रुपये दंड ठोठावला आहे.

जळगाव येथील भाजपच्या १० नगरसेवकांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

२६ मे या दिवशी जळगाव येथील भाजपच्या १० नगरसेवकांनी मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

रायगड जिल्ह्यातील माथेरान नगर परिषद येथील १० शिवसेना नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये २७ मे या दिवशी कोल्हापूर येथे रायगड जिल्ह्यातील माथेरान नगरपरिषद मधील १० शिवसेना नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.

३ अपत्यांमुळे सोलापूर येथील शिवसेना नगरसेविकेचे पद रहित

मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल ३ अपत्ये असल्यामुळे नगरसेवक पद रहित

बुलढाणा येथे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचे वाहन जाळण्याचा अज्ञातांकडून प्रयत्न

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचे चारचाकी वाहन जाळण्याचा प्रयत्न २ अज्ञात व्यक्तींकडून करण्यात आला. २६ मे या दिवशी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

राजभवनातून धारिका गहाळ झाल्याप्रकरणी शिवसेना पुणे शहरच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदन

विधान परिषदेसाठी शिफारस करण्यात आलेल्या १२ सदस्यांच्या नावाची धारिका राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे देण्यात आली होती. राज्यपालांनी १२ नावे गहाळ झाल्याचे सांगितले.

गंगेतून वाहून आलेल्या सहस्रो प्रेतांविषयी सरसंघचालक मोहन भागवत यांनी मत व्यक्त करावे, अशी अपेक्षा होती !

गंगा नदीच्या प्रवाहात सहस्रो प्रेते वाहून आली. हा विषय हिंदुत्वाचा होता. राम मंदिराइतकाच महत्त्वाचा होता. त्यावर सरसंघचालक मोहन भागवत यांनी मत व्यक्त करावे, अशी आमची अपेक्षा होती,..