‘बाळकडू’ चित्रपटाच्या महिला निर्मात्याला अटक !

स्वप्ना पाटकर

मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित बाळकडू चित्रपटाच्या निर्मात्या आधुनिक वैद्या स्वप्ना पाटकर यांना फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी अटक केली आहे. खोटी पदवी मिळवून नोकरी मिळवल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे.