वृद्ध पत्नीला मारणारे गजानन चिकणकर पोलिसांच्या कह्यात !

ठाणे – पाणी भरण्याच्या वादातून स्वतःच्या पत्नीला लाथाबुक्क्यांनी आणि बालदीने मारहाण करणारे कल्याण येथील गजानन चिकणकर यांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. त्यांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला होता. त्यानंतर शिवसेनेच्या महिला आघाडीने चिकणकर यांच्या घरी जाऊन त्यांना याविषयी खडसावले होते. या प्रकरणी पोलिसांनी ‘स्युमोटो’द्वारे गुन्हा नोंद केलेला आहे. चिकणकर यांच्या पत्नीने पोलिसांत कोणतीही तक्रार दिलेली नाही; मात्र त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी वाढली होती. यातून पोलिसांवर दबाव आल्याने त्यांनी वरील कारवाई केली. (दबाव आल्यावर कारवाई करणारे कर्तव्यचुकार पोलीस ! – संपादक)