उंचगाव येथे डेंग्यूसह चिकनगुनिया सदृष्य आजार मोठ्या प्रमाणात पसरत असल्याने तातडीने उपाययोजना करा ! – करवीर शिवसेनेचे आरोग्याधिकार्‍यांना निवेदन

असे निवेदन का द्यावे लागते ? प्रशासन स्वतःहून जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असणार्‍या कृती लगेच का करत नाही ? परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी उपाययोजना काढल्यास सर्वांचा वेळ वाचेल.

आरोग्याधिकारी डॉ. जी.डी. नलवडे (डावीकडून दुसरे) यांना निवेदन देतांना राजू यादव (डावीकडून तिसरे) आणि अन्य शिवसैनिक

उंचगाव (जिल्हा कोल्हापूर), ९ जून – उंचगावमध्ये कोरोना समवेत  चिकनगुनिया आणि डेंग्यूसदृश आजारानेही मोठ्या प्रमाणात डोके वर काढले आहे. प्रियदर्शनी कॉलनी, मंगेश्‍वर कॉलनी, रेडेकर गल्ली यांसह संपूर्ण गावात साथ पसरली आहे. तरी उंचगाव येथे डेंग्यूसह चिकनगुनिया सदृष्य आजार मोठ्या प्रमाणात पसरत असल्याने तातडीने उपाययोजना करावी, या मागणीचे निवेदन करवीर शिवसेनेचे तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांनी आरोग्याधिकारी डॉ. जी.डी. नलवडे यांना दिले. या वेळी सर्वश्री दीपक पाटील, संतोष चौगुले, दीपक रेडकर, बाळासाहेब नलवडे यांसह अन्य उपस्थित होते.