पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने कोरोना केंद्रांना आर्थिक पाठबळ आणि गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप !

गरजूंना अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करतांना श्री. राजेश क्षीरसागर, तसेच अन्य

कोल्हापूर – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने  शिवसेना आणि युवा सेनेच्या वतीने कोरोना केंद्रांना आर्थिक सहकार्य अन् गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यात ५ लाख रुपयांचे ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर’ आणि १ सहस्र नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. याशिवाय गांधी मैदान येथील कै. विष्णुपंत इंगवले कोरोना केंद्राला १ लाख रुपये, दिगंबर जैन बोर्डिंग आणि व्हाईट आर्मी कोरोना केंद्राला ५० सहस्र रुपयांचे साहाय्य करण्यात आले.

या वेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर,  शहरप्रमुख श्री. रविकिरण इंगवले, युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, किशोर घाटगे, नंदकुमार मोरे, राहुल चव्हाण, राजू हुंबे यांसह अन्य उपस्थित होते.