स्वस्त धान्य दुकानातील संगणकीय त्रुटी तात्काळ दुरुस्त करा ! – करवीर शिवसेनेचे निवेदन

  • असे निवेदन का द्यावे लागते ? प्रशासन स्वतःहून लक्ष का देत नाही ? – संपादक

  • संगणकीय त्रुटींमुळे जनता धान्य मिळण्यापासून वंचित रहाणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! – संपादक
तहसीलदार विपीन लोकरे (डावीकडे) यांना निवेदन देतांना शिवसेना करवीर तालुकाप्रमुख राजू यादव आणि शिवसैनिक

कोल्हापूर, १ मार्च (वार्ता.) – कोल्हापूर जिल्ह्यासह सर्वच भागांत स्वस्त धान्य दुकानदारांना फेब्रुवारीचे धान्य मिळूनही दुकानातील संगणकीय त्रुटींमुळे ग्राहकांना १५ फेब्रुवारीपासून धान्य मिळालेले नाही. मार्च मास चालू झाल्यावरही हे धान्य गरीब ग्राहकांना मिळालेले नाही. तरी ग्राहकांना झालेला त्रास लक्षात घेता मार्चच्या १० दिनांकापर्यंत गतमासातील धान्य मिळण्यासाठी हे दिवस वाढवून द्यावेत आणि स्वस्त धान्य दुकानातील संगणकीय त्रुटी तात्काळ दुरुस्त कराव्यात, या मागणीसाठी करवीर शिवसेनेच्या वतीने नायब तहसीलदार विपीन लोकरे आणि पुरवठा अधिकारी दत्तात्रय पाडळकर यांना निवेदन देण्यात आले.