उंचगाव (जिल्हा कोल्हापूर), ७ मार्च (वार्ता.) – उंचगाव येथे करवीर शिवसेनेच्या पुढाकाराने ‘बँक आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत ४०० लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी ४ आणि ५ मार्च या दिवशी शासकीय योजनेतील १६ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले. संजय गांधी, श्रावण बाळ, वृद्धापकाळ, इंदिरा गांधी अशा योजनेच्या अंतर्गत असलेल्या लाभार्थ्यांना हे वाटप करण्यात आले. या वेळी शिवसेना करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, युवासेना तालुकाप्रमुख श्री. संतोष चौगुले, ग्रामपंचायत सदस्या श्रीमती अर्चना करी, विभागप्रमुख श्री. दीपक रेडेकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी यांसह अन्य उपस्थित होते.