
मुंबई – येथील शिवसेनेच्या पदाधिकार्यांच्या घरावर आयकर विभागाकडून धाडी टाकण्यात आल्या आहेत. यामध्ये राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेनेचे नेते आणि युवा सेनेच्या कोअर कमिटीचे सदस्य राहुल कनाल, तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय समजले जाणारे स्थानिक शिवसेना नेते संजय कदम यांचा समावेश आहे. या पदाधिकार्यांच्या घरावर ८ मार्च या दिवशी सकाळी धाड टाकण्यात आली.
मुंबईत IT ची आणखी एक धाड; अनिल परब यांच्या निकटवर्तीयाच्या घरावर छापा https://t.co/ql3eme05uC#Mumbai #IncomeTax #ITRaids #AnilParab #SanjayKadam #RahulKanal
— Maharashtra Times (@mataonline) March 8, 2022
या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे म्हणाले, ‘‘भाजपला महाविकास आघाडीची भीती वाटू लागली. तेव्हापासून या धाडी चालू आहेत. उत्तर प्रदेश, भाग्यनगर, बंगाल येथेही असेच करण्यात आले. आता महाराष्ट्रात निवडणुका होणार आहेत; म्हणून येथे त्यांच्या कारवाया चालू आहेत.’’
गोव्यातील धरणांतील जलसाठ्यात लक्षणीय वाढ
अंमलबजावणी संचालनालयाच्या अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी धाडी
उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर मोरजी किनारपट्टीवरील २३ अनधिकृत बांधकामे पाडली
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे नेत्रदीपक रिंगण !
आज मराठी शाळांसाठी मराठी अभ्यास केंद्राची बैठक !
नगरसेवक रमेश म्हात्रे यांना ३ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी !