मुंबई – येथील शिवसेनेच्या पदाधिकार्यांच्या घरावर आयकर विभागाकडून ८ मार्चला धाडी टाकण्यात आल्या. यामध्ये राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेनेचे नेते आणि युवा सेनेच्या ‘कोअर कमिटी’चे सदस्य राहुल कनाल, तसेच परिवहनमंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय समजले जाणारे स्थानिक शिवसेना नेते संजय कदम यांचा समावेश आहे.
या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे म्हणाले, ‘‘भाजपला महाविकास आघाडीची भीती वाटू लागली आहे. तेव्हापासून या धाडी चालू आहेत. उत्तरप्रदेश, भाग्यनगर, बंगाल येथेही असेच करण्यात आले आहे. आता महाराष्ट्रात निवडणुका होणार आहेत; म्हणून येथे त्यांच्या कारवाया चालू आहेत.’’