‘राजधानी सातारा’ची अस्मिता असणार्‍या अजिंक्यतारा गडावरील निकृष्ट प्रतीची कामे खपवून घेतली जाणार नाहीत ! – शिवसेना

अजिंक्यतारा गडावर विविध विकासकामे चालू आहेत मात्र ही कामे निकृष्ट प्रतीची झाली आहेत. निकृष्ट प्रतीची कामे खपवून घेतली जाणार नाहीत, अशी चेतावणी शिवसेनेचे सातारा शहरप्रमुख नीलेश मोरे यांनी दिली आहे.

अमरावती येथे पुतळे बसवण्यावरून राजकारण : शहरासह दर्यापूर येथे तणाव !

शहरातील राजापेठ उड्डाणपुलावर अनधिकृतरित्या बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा महापालिका प्रशासनाने काढल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. याचे पडसाद जिल्ह्यातील दर्यापूर गावातही उमटले आहेत.

उंचगावसह (जिल्हा कोल्हापूर) प्रत्येक गावातील ७/१२ उतार्‍यातील ‘ऑफलाईन’वर असणारी नावे ‘ऑनलाईन’वर चुकीची आल्याने ती तात्काळ दुरुस्त करा ! – करवीर शिवसेनेचे निवेदन

उंचगावसह प्रत्येक गावात सध्या ‘ऑनलाईन’ उतारा देण्याचे काम शासनाने चालू केले आहे; मात्र असे होत असतांना पूर्वी असलेल्या हस्तलिखितातील नावे योग्य असून ‘ऑनलाईन’ उतार्‍यात मात्र नावात पालट झालेले दिसून येत आहेत.

अंबरनाथ येथे शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी प्रायोजित केलेले सनातन-निर्मित ग्रंथ आणि सनातन-निर्मित उत्पादने यांचे दोन कार्यक्रमांच्या माध्यमातून वितरण !

शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना सनातनच्या धर्मकार्याविषयी आत्मियता असल्याने त्यांनी सनातन-निर्मित विविध विषयांवरील ग्रंथ आणि सनातन-निर्मित उत्पादने प्रायोजित केली होती.

श्री चौरंगीनाथ डोंगराच्या पायथ्याशी चालू असलेले शेरे हद्दीतील खडीक्रशर आणि उत्खनन तात्काळ बंद करून संबंधितांवर कडक कारवाई करा !

डोंगर पोखरला गेल्याने डोंगराची अवस्था पहावत नाही. या उत्खननामुळे मंदिरातील खांबांना तडे गेले असून मंदिराच्या मंडपालाही धोका निर्माण झाला आहे.

जळगाव महापालिकेतील नगररचना विभागात नागरिकांची पिळवणूक होते !

शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक यांचा आरोप

जळगाव येथील भाजपच्या २९ नगरसेवकांना विभागीय आयुक्तांची नोटीस !

भाजपच्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे प्रकरण

मुंबई महापालिकेच्या आश्रय योजनेत १ सहस्र ८४४ कोटी रुपयांचा घोटाळा !

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आश्रय योजनेतील झालेल्या अपव्यवहाराची चौकशी करावी, असा आदेश लोकायुक्तांना दिला आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच कोल्हापूर जिल्हा बँकेची निवडणूक ! – राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

कोल्हापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी मतदार या लढ्यात शिवसेनेसमवेत राहील आणि जिल्हा बँकेतील मक्तेदारी मोडून निघेल, असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केला आहे.

थकबाकी असलेल्यांच्या हाती सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सूत्रे गेल्याचे दु:ख ! – सतीश सावंत, शिवसेना नेते

पराभवावर बोलतांना सावंत म्हणाले, ‘‘या निवडणुकीत धनशक्ती आणि बळ यांचा वापर केला गेला. संतोष परब यांच्यावर आक्रमण करून ‘आमच्यासोबत राहिला नाहीत, तर तुमचाही संतोष परब होईल’, अशी भीती मतदारांमध्ये निर्माण केली गेली.