हिंदूंच्या मंदिरांवरील आक्रमणांत दुपटीने वाढ !

पाकिस्तान सरकारला घरचा अहेर ! भारतातील अल्पसंख्यांकांवरील कथित अत्याचारांविषयी गळे काढणार्‍या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना आता पाकमधील अल्पसंख्य हिंदूंच्या दुःस्थितीविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

सरकार जर धर्मनिरपेक्ष आहे, तर त्यांनी मशिदी, चर्च यांचेही अधिग्रहण करावे ! – परमहंस डॉ. अवधेशपुरी महाराज, ‘स्वस्तिक पीठा’चे पीठाधीश्वर, उज्जैन

सरकार केवळ हिंदूंची मंदिरे नियंत्रणात का घेत आहे ? सरकार जर धर्मनिरपेक्ष आहे, तर त्यांनी मंदिरांप्रमाणे मशिदी, चर्च यांचेही अधिग्रहण करावे.

जमशेदपूर (झारखंड) येथे धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण !

झारखंडमध्ये हिंदुद्रोही झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार असल्याने धर्मांध मुसलमानांचे फावते आहे. अशा प्रकारची आक्रमणे होणे, ही झारखंड मुक्ती मोर्चासारख्या हिंदुद्रोही पक्षांना निवडून सत्तेवर बसवणार्‍या हिंदूंना शिक्षाच म्हणावी लागेल !

कॅनडात पुन्हा हिंदु मंदिराची तोडफोड : भारतविरोधी घोषणाही लिहिल्या !

या घटनांमागे खलिस्तानवादी असण्याची शक्यता ! त्यांना तेथील सरकार पाठीशी घालत असल्यानेच या घटना सतत घडत आहेत, भारत सरकारने कॅनडा सरकारला समजेल अशा भाषेत सांगून दोषींवर कठोर कारवाई करण्यास भाग पाडले पाहिजे !

सरकार ‘गोवा देवस्थान नियमन कायद्या’त सुधारणा करणार

महाराष्ट्रात आहे तशी परिस्थिती गोव्यात होऊ नये, यासाठी देवस्थान समित्यांनी मंदिरे शासनाच्या कह्यात जाणार नाहीत, हे पहाणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे देवस्थान समित्यांवर भक्तांची नेमणूक करून घोटाळे होणार नाहीत, असे पहाणे आवश्यक आहे.

सरकारने दर्गा आणि मशिदीवर कारवाई करून मंदिरे उभारण्याची मनसेची मागणी !

पुण्येश्वर आणि नारायणेश्वर या दोन्ही ठिकाणी राज्य सरकारने तात्काळ उत्खनन चालू करून तिथे पुन्हा मंदिरे उभारावीत, अशी मागणी मनसेने केली आहे.

श्री तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचाराचे प्रकरण पडताळून कार्यवाही करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना !

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणातील सर्व माहिती पडताळून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.

महाराष्‍ट्रात हिंदु देवस्‍थानांच्‍या भूमींची लूट चालू आहे ! – आमदार जयंत पाटील, राष्‍ट्रवादी काँग्रेस

संत भूमी असलेल्‍या महाराष्‍ट्रात हिंदु देवस्‍थानांच्‍या भूमींची लूट होणे, हा मंदिर सरकारीकरणाचा दुष्‍परिणाम !

पोखरापूर (सोलापूर) येथील श्री जगदंबादेवीचे पुरातन मंदिर वाचवण्यास अपयशी ठरलेला पुरातत्व विभाग !

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग क्रमांक ९६५ मध्ये मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथील श्री जगदंबादेवीचे इ.स. १२३५ च्या काळातील हेमांडपंथीय पद्धतीचे पुरातन मंदिर ४ मार्चच्या रात्री पुनर्राेपण (मंदिर अन्यत्र उभारणे) करण्यासाठी भुईसपाट करण्यात आले.

किशनगंज (बिहार) येथे आग लागल्याने मंदिर जळून खाक !

गावकर्‍यांना संशय आहे की, मंदिराची तोडफोड करून त्यास आग लावण्यात आली. यामुळे त्यांनी येथे निदर्शने करून ‘रस्ता बंद’ आंदोलन करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली.