प.पू. डॉ. आठवले यांना पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांच्या शरिरावरील रक्त साकाळल्यामुळे पडलेले काळे डाग दाखवल्यावर ते डाग आश्चर्यकारक गतीने उणावणे 

पू. निर्मला दातेआजी

‘पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (सनातन संस्थेच्या ४८ व्या व्यष्टी संत, वय ९१ वर्षे) या अनेक ४ महिने बेशुद्ध असून त्यांच्यावर आधुनिक वैद्य औषधोपचार करत आहेत. पू. आजींना सध्या त्यांच्या आजाराच्या दृष्टीने रक्त पातळ होण्यासाठी औषधे चालू आहेत. मागील २ दिवसांपूर्वी त्यांची पाठ, काख आणि छाती या जागी रक्त साकळल्याने अनुमाने ६ इंच आकाराचे काळे डाग पडले होते.

सौ. ज्‍योती दाते

ते डाग मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दाखवल्यावर दुसर्‍याच दिवसापासून ते डाग आश्चर्यकारक गतीने न्यून होण्यास आरंभ झाला. केवळ २ दिवसांतच डागांचे प्रमाण ७० टक्के उणावले. ‘परात्पर गुरु डॉक्टरांची दृष्टी पडल्यावर कितीही तीव्र त्रास असला, तरीही तो लगेच न्यून होतो. त्यांच्या एका दृष्टीक्षेपाने ते काहीही करू शकतात’, याची अनुभूती मला घेता आली. त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे.’ – सौ. ज्योती दाते (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.११.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक