१. मनुष्याला खर्या सुख-दुःखाचे ज्ञान नसते. तो ‘आपल्या मनाप्रमाणे होणे म्हणजे सुख’ आणि ‘मनाविरुद्ध होणे म्हणजे दुःख’, असे समजतो.
२. जेव्हा मनुष्य खरोखर दुःखी होतो (त्याच्यात विरक्ती निर्माण होते), तेव्हा त्याला कोणतेही सुख भोगण्याची इच्छा होत नाही. त्याची भोगवासना नष्ट होते.
३. जेव्हा मनुष्याला एखाद्या दुःखामुळे विरक्ती येते, तेव्हा ते दुःखच त्याची ईश्वराशी भेट घालून देते; कारण सुखभोगाची आवड आणि आसक्ती यांमुळेच मनुष्य सुखलोलुप होतो. तो भोगवासनेच्या निवृत्तीमुळेच भगवंताकडे वळतो आणि संसारापासून विन्मुख होतो.
– ब्रह्मलीन श्रद्धेय स्वामी श्रीशरणानन्दजी महाराजके प्रवचनोंसे संकलित (साभार : मासिक, ‘कल्याण’, फरवरी २०२२)