
‘७.९.२०२४ या दिवशी पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांना भेटण्यासाठी त्यांच्या खोलीत गेल्यावर श्रीमती रत्नप्रभा बबन कदम यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

१. ‘पू. दातेआजींच्या खोलीत गेल्यावर मला लख्ख प्रकाश दिसला.
२. मला पू. आजींच्या आज्ञाचक्रावर चैतन्य जाणवत होते.
३. पू. आजींकडे पाहिल्यावर मला त्यांचे ओठ हलल्यासारखे वाटले.
४. पू. आजींना पाहून माझ्या मनात विचार आला, ‘त्या झोपल्या नसून त्यांचे देवाशी अनुसंधान चालू आहे.’
‘मला संतांचे चैतन्य अनुभवण्याची संधी दिल्याबद्दल मी गुरुदेवांप्रती कोटीशः कृतज्ञता व्यक्त केली.’
– श्रीमती रत्नप्रभा बबन कदम (वय ६० वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२७.९.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |