
प्रयागराज, २८ जानेवारी (वार्ता.) – सनातन धर्म अनादी काळापासून चालत आलेला आहे. या सनातन धर्माला दिशा देण्याचे उल्लेखनीय कार्य सनातन संस्था करत आहे. आम्ही सनातन संस्थेला साहाय्य करण्यासाठी सदैव सिद्ध आहोत, असे वक्तव्य श्री चैतन्य सेवा धाम कन्नड, महाराष्ट्र येथील श्री आनंद चैतन्यजी महाराज यांनी केले. कुंभक्षेत्री सनातनच्या ग्रंथ प्रदर्शनाला त्यांनी भेट दिल्यानंतर ते बोलत होते.
श्री आनंद चैतन्यजी महाराज पुढे म्हणाले की,
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या मार्गदर्शनाने सनातन संस्था करत असलेले हे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे.
२. पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण केल्याने लोकांना हिंदु धर्माचा विसर पडत आहे. त्यामुळे तरुण पिढी संस्कारहीन होत आहे. त्यांच्यामध्ये हिंदु संस्कृतीविषयी जागृती करण्याचे कार्य सनातन संस्थेचे साधक करत आहेत.
३. गुरुकृपेविना हे कार्य करणे अशक्य आहे. सनातनच्या साधकांवर गुरुकृपा असल्यानेच ते कार्य करू शकतात. सनातन संस्थेचे कार्य वृद्धींगत होण्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना आहे.