Mahakumbh 2025 : महाकुंभातील सनातनचे ग्रंथ प्रदर्शन पाहून ८ राज्यांतील जिज्ञासू भारावले !

  • अनेक जिज्ञासूंची सनातनच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा !

  • सनातनचे विषय पाठ्यपुस्तकात घेऊन इतर गावांत प्रदर्शन लावण्याची जिज्ञासूंची मागणी !

श्री. सचिन कौलकर, विशेष प्रतिनिधी, प्रयागराज

सनातनचे ग्रंंथ आणि धर्मशिक्षण प्रदर्शन पहाण्यासाठी भाविकांची झालेली गर्दी

प्रयागराज, २६ जानेवारी (वार्ता.) – महाकुंभक्षेत्री लावण्यात आलेल्या सनातनच्या ग्रंथ आणि धर्मशिक्षा प्रदर्शनाला जिज्ञासूंच्या प्रतिसादाचा ओघ चालूच आहे. हे प्रदर्शन पहाण्यासाठी भाविकांची लक्षणीय गर्दी होत आहे. सनातनच्या प्रदर्शनातून अमृतासारखी सुरेख माहिती वाचून अनेक जिज्ञासू भारावून गेले असून ‘आमची सनातनच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा आहे. आम्हाला सनातनच्या कार्याशी जोडायचे आहे, आमच्या गावात हे प्रदर्शन लावावे. शालेय पाठ्यपुस्तकात प्रदर्शनातील विषय घ्यावेत’, असे अनेक उत्स्फूर्त अभिप्राय अनेक जिज्ञासूंनी दिले आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या महाकुंभात सनातनच्या कार्याशी जोडून घेण्याविषयी उत्तरप्रदेशसह, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, आसाम, ओडिसा, काश्मीर राज्यांतील जिज्ञासूंनी अभिप्राय दिले आहेत.

सनातनच्या ग्रंथ प्रदर्शनाला कुंभक्षेत्रातील विविध आखाड्यांतील संत-महंत भेटी देत आहेत. आतापर्यंत प्रदर्शनाला भेट देणार्‍या सर्वच संत-महंतांना प्रदर्शन पुष्कळ आवडले आहे. याचसमवेत बर्‍याच जिज्ञासूंनी प्रदर्शन चांगले, उत्कृष्ट असल्याचा अभिप्राय दिला आहे, तसेच अनेक जिज्ञासूंनी ‘सनातनच्या प्रदर्शनातील माहितीमुळे महत्त्वपूर्ण धर्मशिक्षण मिळते, पुष्कळ शिकायला मिळते, सध्याच्या काळात अशा प्रदर्शनाची आवश्यकता आहे’, असेही अभिप्राय दिले आहेत. यासह सनातनचे प्रदर्शन लावून पुष्कळ वेळ उत्साहीपणे सेवा करणार्‍या सनातनच्या साधकांचे जिज्ञासूंनी कौतुक केले आहे.

सनातनचे ग्रंथ आणि धर्मशिक्षा प्रदर्शन पाहून जिज्ञासूंनी व्यक्त केलेले अभिप्राय असे…

१. हे प्रदर्शन पाहून चांगले वाटले. देशात अनेक अनावश्यक गोष्टींवर पैसे व्यय केेले जात आहेत. त्याहून अधिक चांगले सनातन संस्था चांगले कार्य करत आहे. खरेतर हिंदु राष्ट्रासाठी पैसे व्यय केेले पाहिजेत. – आचार्य रामायण प्रसाद, पटवारी आश्रम, रिगा, मध्यप्रदेश

२. सनातन संस्थेशी जोडून कार्य करण्याची आणि हिंदु राष्ट्रासाठी योगदान देण्याची माझी इच्छा आहे ! – श्री. अभय सिंह, श्री. आशिष सिंह आणि श्री. अनुराग मिश्रा, मिर्झापूर, उत्तरप्रदेश.

३. हे प्रदर्शन पाहून मला पुष्कळ आनंद झाला. माझी सनातनच्या कार्याशी जोडण्याची इच्छा आहे. माझ्या जिल्ह्यातही हे प्रदर्शन लावावे ! – हिमांशु, नवाबगंज, बरेली, उत्तरप्रदेश.

४. अतिशय आकर्षकपणे ग्रंथ प्रदर्शने लावले आहे. तुम्ही धर्मजागृतीचे कार्य करता, हे कौतुकास्पद आहे. पुष्कळ वेळ देऊन प्रदर्शन लावण्याची सेवा करणार्‍या सर्व साधकांचा उत्साह मोठा आहे. – श्री. सुनील कुमार शुक्ला, बिद्दिया, नवाबगंज, प्रयागराज, उत्तरप्रदेश.

५. प्रत्येक व्यक्तीने वेळ काढून सनातनचे प्रदर्शन पाहून सनातन संस्कृतीला समजून घेतले पाहिजे. हे प्रदर्शन अद्भूत आणि सुंदर आहे. यातून पुष्कळ शिकायला मिळाले. ईश्‍वराने या संस्थेला पुढे न्यावे. – श्री. अनुराग तिवारी, प्रयागराज, उत्तरप्रदेश.

६. सनातनचे ग्रंथ प्रदर्शन माझ्या गावातही उभारण्यात यावे, अशी माझी इच्छा आहे ! – स्वामी सोम प्रकाश महाराज, संधौड, पंजाब.

७. माझी सनातनच्या कार्याचा प्रचार करण्याची इच्छा आहे ! – गायत्री गिरि, जुना आखाडा, श्रीनगर, गुजरात.

८. प्रदर्शन पाहून आनंद झाला. आपण सर्व एकत्र येऊन सनातनचा प्रचार करण्याचे कार्य करूया ! – श्री. जिले सिंह, भिपाली, हरियाणा.

९. माझी हिंदु राष्ट्र कार्याशी जोडायची इच्छा आहे. मी स्वतः बालसंस्कार वर्ग घेतो. -श्री. रसिक लोचन पांडे, ओडिशा

१०. मला सनातन संस्थेशी जोडून कार्य करण्याची इच्छा आहे ! – श्री. राजेश साहू आणि श्री. फुलचंद्र विश्‍वकर्मा, ललितपूर, उत्तरप्रदेश.

११. अधिवक्ता पवन कुमार खनुरिया, जम्मू – सनातनचे प्रदर्शन पाहून चांगले वाटले. हे कार्य करत असल्याविषयी सनातनच्या साधकांना धन्यवाद देतो. तुमच्या वतीने आयोजित केलेल्या अधिवक्त्यांच्या बैठकीला मी ऑनलाईन सहभागी होईन.

१२. श्री. कुलदीप कुमार, प्रयागराज, उत्तरप्रदेश – हे प्रदर्शन पाहिल्यानंतर धर्म, कर्म, पूजा तथा स्नान कसे करायचे ?, दानाचे महत्त्व याची संपूर्ण माहिती मिळाली. या प्रदर्शनातून मला पुष्कळ शिकायला मिळाले.

१३. रुपाली अग्रवाल, हरियाणा – वर्तमान काळात सनातन संस्कृतीचे ज्ञान लुप्त होत आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून संस्कृतीला पुर्नसंस्थापित करण्याचे प्रयत्न कौतुकास्पद आहे.

१४. श्री. मदन मोहन पंडा, ओडिसा – हिंदु राष्ट्र कार्याशी माझी जोडण्याची इच्छा आहे.

१५. श्री. मुकुंद लाल, प्रयागराज, उत्तर प्रदेश – मी साधनेविषयी माहिती हवी आहे, तसेच मला साधना करण्याची इच्छा आहे.

१६. श्री. प्रेमचंद मूंड, राजस्थान – मला सनातन संस्थेचा सदस्य व्हायचे आहे. तुम्ही चांगले कार्य करत आहात. माझ्या गावी मी निष्कामपणे आयुर्वेदीक औषध देऊन रुग्णांवर उपचार करतो. तसेच लोकांना चांगले संस्कार, स्वास्थ, उत्तम ज्ञान आणि रोजगार देण्याविषयी माहिती देतो.

१७. श्री. अमित गुप्ता, जम्मू काश्मीर – प्रदर्शन पुष्कळ चांगले आहे. सनातन संस्थेची शाखा जम्मू येथे असावी, असे मला वाटते.

१८. श्री. मनोज कुमार, हरियाणा – प्रदर्शन पुष्कळ प्रभावी आहे. सनातनच्या कार्याशी जोडून तुम्हाला साहाय्य करण्याची माझी इच्छा आहे.